पोलिसांना शिवीगाळ प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचा माफीनामा , म्हणाले ‘ मी त्यावेळी.. ‘

मित्राची कार पकडून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची 31 डिसेंबरच्या रात्री पोलीस ठाणे पोलीसांशी बोलत असताना जीभ घसरली आणि त्यांनी पोलिसांना अक्षरश: अश्लील शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी माता भगिनींची हात जोडी हात जोडून माफी मागितली आहे. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता आणि अनेकजणांनी त्यांच्या या वर्तनावर टीका व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.

ट्रान्सपोर्ट व्यवसायिक अविनाश वसंत पटले आणि त्यांचा एक मित्र हे दोघे 31 डिसेंबरच्या रात्री नागपूरहून भंडारा मार्गे तुमसरकडे जात होते. मोहाडी येथे पोलिसांनी अडवून त्यांना मारहाण केली असा आरोप आहे. सदर प्रकार माहित होताच आमदार कारेमोरे रात्री मोहाडी ठाण्यात पोहोचले आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करताना त्यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला त्यानंतर आमदारांच्या या भाषेवर विविध समाज माध्यमातून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी मोहाडी येथे पत्रकार परिषद घेऊन आपला माफीनामा सादर केला.

आमदारांनी म्हटले आहे की, ‘ मी त्यावेळी पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलो असताना शाब्दिक वार झाले आणि त्यातून आपली जीभ घसरली ‘. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजू कारेमोरे यांना राहत्या घरातून अटक केली होती. आमदार राजू कारेमोरे यांनी पोलीस ठाण्यातच धिंगाणा घातला होता. आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र काल रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान आमदारांच्या घरून 50 लाख रुपयांची रोकड घेऊन एका गाडीतून तुमसरकडे घेऊन जात होते. यावेळी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गाडी चालकाला इंडिकेटर का दिले नाही? म्हणून गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली.

गाडीतील यासीम छवारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. पटले आणि छवारे यांच्याजवळील 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छावारे यांनी मोहाडी पोलिसात दिली.