देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली असून लग्न झाल्यावर लग्नाच्या पहिल्या रात्रीच आपली पत्नी चक्क पाच महिन्यांची गर्भवती आढळून आल्याने पतीला चांगलाच धक्का बसलेला आहे . उत्तर प्रदेशच्या मेरठमधील ही घटना असून लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीला समजलं की त्याची पत्नी ५ महिन्यांची गर्भवती आहे. पत्नीच्या माहेरच्यांशी वाद झाल्यानंतर माहेरच्या लोकांनी त्यालाच चक्क गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्यावर पती आता पोलिसात गेला आहे.
पतीच्या म्हणण्यानुसार ,त्याने जेव्हा पत्नी प्रेग्नेंट असल्याची बातमी सासरच्या लोकांना सांगितली तेव्हा सासरच्या लोकांनी उलट त्यालाच खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी दिली आणि गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात त्याच्याकडेच चक्क १० लाख रुपये देखील मागितले. आपली या विवाहात फसवणूक झालेली असून पतीने न्याय मिळावा म्हणून पोलिसात धाव घेतली आहे .
नवविवाहित तरुणाने न्यायासाठी मेरठ एसएसपी ऑफिसमध्ये लिखित तक्रार देत पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.मुलाच्या वडिलांनी देखील म्हटले आहे की, लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी त्यांच्या मुलाला म्हणाली होती की तिच्या पोटात दुखत आहे मात्र पोटाचा आकार मोठा दिसून आल्याने पती तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये तिचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट पाहिल्यावर पती आणि त्याच्या घरातील लोकांच्या पायाखालची जमिनीच सरकली.
आपल्यासोबत झालेल्या हा फसवणुकीने पती हतबल झाला असून अल्ट्रासाउंड रिपोर्टमध्ये पत्नी ५ महिन्यांची प्रेग्नेंट असल्याचं समजलं आणि धक्कादायक बाब म्हणजे तिच्या पोटात जुळे बाळ आहेत. पत्नीच्या माहेरच्या लोकांनी हे मान्य करण्यास नकार दिला आणि उलट तरूणालाच फसवण्याची धमकी दिली गेली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.