बीड हादरले..’ मोहिनीच्या खांद्यावर हाथ ठेव ‘, हनी ट्रॅपची स्टाईल पाहून पोलिसही चकित

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील केज येथे उघडकीस आली आहे. हनी ट्रॅप या प्रकरणातून एका युवकाला लुटण्याची ही घटना असून बीडमध्ये या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. भाड्याने कार घेऊन वाटेत साथीदाराकडून एका गॅरेज मालकाला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर बळजबरीने त्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवायला लावून त्याचे फोटो घेण्यात आले आणि आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी देत त्याच्याकडून एक लाख रुपये उकळले.

उपलब्ध माहितीनुसार, हनी ट्रॅपचा हा धक्कादायक प्रकार तीन जानेवारी रोजी मध्यरात्री घडलेला असून 4 जानेवारी रोजी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिचे साथीदार मात्र फरार झालेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मोबाईलमध्ये कॅमेऱ्याची सुविधा आल्यानंतर आणि हनी ट्रॅपच्या प्रकारात धक्कादायक वाढ झालेली आहे. आत्तापर्यंत मोठे पुढारी असेच आणि व्यावसायिक असेच या चोरट्यांचे लक्ष होते मात्र आता सामान्य नागरिकांपर्यंत देखील हा प्रकार येऊन ठेपलेला आहे.

27 वर्षीय तरुणाचे केजमध्ये गॅरेज असून मोहिनी भांगे ( वय 27 राहणार शिक्षक कॉलनी केज ) व तिच्या मामाचा मुलगा अशोक मिसाळ ( राहणार कोल्हेवाडी तालुका बीड ) हे दोघेही तक्रारदाराच्या परिचयाचे आहेत. वाहन दुरुस्तीच्या कामानिमित्त त्यांची ओळख झाली होती.

3 जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता मोहिनी भांगे हिने फोन करून आंबाजोगाई येथील दवाखान्यात पाहुण्यांना भेटायला जायचे असल्याचा बहाणा केला आणि गॅरेज मालकाला कार घेऊन मला आंबाजोगाईकडे घेऊन चला असा आग्रह केला. धारूरपासून पुढे तीन चार किलोमीटर अंतरावर गेल्यावर पाठीमागून एक पांढरी कार आली आणि तक्रारदार आणि मोहिनी भांगे यांना रस्त्यातच अडवले.

गाडीतून उतरलेल्या एक जणाने गॅरेज चालकाला दुसऱ्या कारमध्ये बसवले आणि एका निर्जन स्थळी नेऊन त्याच्या खात्यावरील अकरा हजार रुपये हे मोहिनी हिच्या खात्यात वळते करायला लावले तसेच गाडीच्या डिकीत ठेवलेले 90 हजार रुपये देखील काढून घेण्यात आले. तक्रारदाराला मोहिनी हिच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढायला लावण्यात आले त्यानंतर तक्रारदार यास बलात्काराचा गुन्हा नोंदवून आयुष्यभर कारागृहात टाकण्याची धमकी देण्यात आली. घाबरलेल्या तक्रारदाराने तात्काळ पोलिसात धाव घेतली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून मोहिनी हिला अटक करण्यात आली.


शेअर करा