पुणे जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ तरुणीच्या खुनाचे रहस्य उलगडले.. धक्कादायक सत्य आले बाहेर

  • by

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील थोपटेवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची विवस्त्र करून हत्या करण्यात आल्याने पुणे जिल्हा हादरला होता मात्र काही कालावधीतच पोलिसांना या घटनेचा पर्दाफाश करून मुख्य आरोपीस अटक करण्यात यश आले आहे . आरोपी हा मुलीच्या नात्यातीलच असून त्याने दिलेल्या माहितीने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, मुलगा भारुडात ‘स्त्री’ भूमिका करत असल्याने मयत मुलगी त्याला सतत चिडवत असे तसेच त्याच्याविषयी वाईट बोलत असते . त्याला ह्या प्रकाराचा राग येत होता त्यातून त्याने टीव्हीवरील ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ या मालिका तसेच ‘कंचना’ सिनेमा कित्येक वेळा पाहिला आणि तिची हत्या करण्याचा प्लॅन केला.

24 जुलै रोजी सदर तरुणीला विवस्त्र करून तिची हत्या केल्यानंतर तो साळसूदपणाचा आव आणत होता .पीडित कुटुंबीयांच्या भेटीला आलेल्या विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासमोर बसला होता. मात्र, आरोपी तरुणाचा साळसूदपणा फार काळ टिकला नाही . चाकण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत मुलगी आपल्याला वाईट बोलली होती. त्याच रागातून आरोपीने तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.

भामा आसखेड परिसरात 24 जुलैला दुपारी तीन वाजेच्या सुमारास आरती नामक अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करुन तिला विवस्त्र करून तिचा मृतदेह झाडाझुडुपांत फेकण्यात आला होता. सदर अल्पवयीन आरोपी मृत तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता मात्र तो भारुडात स्त्री भूमिका करत असल्याने या तरुणीने त्याला वारंवार स्पष्ट नकार दिला होता, अशी देखील माहिती समोर आली आहे . त्याचा राग मनात धरून या मुलाने तरुणीची हत्या केली आणि मृतदेह धरणाजवळ झाडीत फेकून दिला.

या प्रकरणी चाकण पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला. सदर प्रकरणाच्या चौकशीत त्याची मध्येमध्ये होत असताना लुडबुड पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवणे सुरु केले. त्याच्या सातत्याने होत असलेल्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटल्या नाहीत आणि अखेरीस आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असताना त्याने गुन्ह्याची अखेर कबुली दिली असून चाकण पोलिस पुढील तपास करत आहेत.