‘ आई त्याच्यावर गुन्हा नको गं ‘, अल्पवयीन मुलीने पोलिसांपुढेच रडायला केले सुरु अन त्यानंतर..

शेअर करा

ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमाने अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल फोन आल्यापासून त्याचे दुष्परिणाम देखील समोर येत आहेत. अशीच एक घटना नागपूर येथे उघडकीस आली असून इयत्ता आठवी येथे शिकत असलेल्या एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे इंस्टाग्रामवर मुंबईतील एका वीस वर्षीय तरुणासोबत प्रेम जुळले आणि ती फरार होण्याच्या तयारीत असताना तिला आणि तिच्या प्रियकराला पकडण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलगी अल्पवयीन होती शिवाय तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता. ती नागपूर रेल्वे स्टेशनवर मुंबईला जाण्याच्या तयारीत असताना टीसीला सहज शंका आली आणि आणि त्याने दोघांनाही पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले. मुलीचे नाव माधुरी असल्याचे समजते.

आकाश असे या तरुणाचे नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे. मुंबईला तो एका खाजगी कंपनीत काम करतो आणि अधून मधून मुलीला भेटण्यासाठी तो नागपूर येथे येत होता. गुरुवारी अल्पवयीन मुलगी माधुरी शाळेचा गणवेश आणि स्कूल बॅग घेऊन बाहेर पडली होती त्यानंतर ती आकाशला भेटली आणि त्यांनी मुंबईला पळून जाण्याचा देखील प्लॅन केला होता मात्र टीसीच्या सतर्कतेपणामुळे तिला वाचवण्यात आले.

रेल्वे सुरक्षा दलाच्या समोर चांगला राडा झालेला पाहायला मिळाला. यावेळी मुलीच्या आईने पळवून नेणाऱ्या आकाशवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगताच मुलीने रडायला सुरू केले आणि आईला गुन्हा दाखल करू नको अशी विनंती केली. मात्र आई ऐकण्याच्या मनस्थितीत नसताना अखेर माधुरीने पुन्हा त्या मुलाशी संपर्क ठेवणार नाही असे वचन दिल्यामुळे आई-वडिलांनी आकाश याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तसेच पोलिसांनी मुलाच्या भावाला बोलावून पुन्हा या मुलीला भेटायचे नाही अशी तंबी दिल्यानंतर त्याची देखील सुटका करण्यात आली.


शेअर करा