पुणे हादरले..महिला वकिलाला पोलीस म्हणाला ‘ चल लॉजवर ‘ अन त्यानंतर मात्र..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून चक्क एका पोलिसाने व्यवसायाने वकील असलेल्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला असल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे . चतु:श्रृंगी पोलिसांनी या पोलीस काँस्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून लक्ष्मण गंगाधर राऊत (वय ३३, रा. पत्रा चाळ, पाषाण मुळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस काँस्टेबलचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मेट्रोमोनियल साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस काँस्टेबलने महिला वकीलाशी शरीर संबंध ठेवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.लक्ष्मण गंगाधर राऊत हा सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत असून एका २९ वर्षाच्या महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला आणि लक्ष्मण राऊत यांची मार्च २०२० मध्ये मेट्रोमोनियल या विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली. एका ओळख झाल्यावर राऊत याने फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन त्यांच्याशी ओळख वाढविली आणि त्यानंतर ते तासनतास एकमेकांशी बोलू लागले. दरम्यानच्या काळात पीडित महिलेचा देखील त्याच्यावर विश्वास बसला.

संशयित आरोपीने त्यानंतर महिलेला देहुरोड पिंपळे निलख येथील लॉजवर नेऊन तिथे ‘ आपण लग्न करूया ‘ असे म्हणत त्यांच्यावर वेळोवेळी अत्याचार केले आणि नंतर लग्नास मात्र नकार दिला. व्यवसायाने वकील असलेल्या या महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दिली असून तपास सुरु आहे .


शेअर करा