पुणे हादरले..उठता बसता आधार म्हणून ऐंशीव्या वर्षी गुपचूप वधुवर सुचक मंडळात नोंदणी केली मात्र..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथे उघडकीस आली असून वयाच्या ८० व्या वर्षी वडिलांनी विवाहनोंदणी कार्यालयात नोंदणी केली म्हणून संतप्त झालेल्या मुलाने वडिलांचा खून केला आहे. घटनेमागील कारण समोर येताच परिसरात या घटनेची जोरदार चर्चा आहे. शंकर रामभाऊ बो-हाडे असे मृत व्यक्तीचे नाव असून प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे समजते .

उपलब्ध माहितीनुसार , शंकर रामभाउ बो-हाडे ( वय ८० रा.वैशांयपन आळी, राजगुरूनगर ता. खेड ) यांनी वृद्ध झाल्यामुळे आपल्याला कोणाचा तरी उठता बसता आधार व्हावा या हेतूने एका वधुवर सुचक मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली आणि तिथे आपली सगळी माहिती देऊन आपण विवाहास इच्छुक असल्याचे सांगितले मात्र सदर प्रकाराची माहिती त्यांनी आपल्या मुलाला दिली नाही. इतक्या उतारवयात वडील लग्न करत आहेत यातून वाद सुरु झाला .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर रामभाउ बो-हाडे यांनी परस्पर वधु – वर सुचक मंडळात पैसे भरून स्वत:च्या लग्नाची नोंदणी केली मात्र त्याबद्दल त्यांनी मुलाला सांगितले नाही. मुलाला त्रयस्थ व्यक्तीकडून ही माहिती समजल्याने वडील शंकर बोऱ्हाडे हे आपल्याशी मुलगा असून खोटे बोलले याचा त्याला राग आला होता आणि त्यातूनच वादावादीला सुरुवात झाली.

भांडणाचे रूपांतर मारामारीत होऊ लागल्याने शेखर बोऱ्हाडे याने किचन रूममधील कांदा कापण्याची सुरी घेवुन वडीलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला मात्र सुरीला धार नसल्याने त्याला त्यात यशआले नाही म्हणून त्याने चक्क घरात असलेल्या दगडी वरवंटयाने वडील शंकर बोऱ्हाडे यांच्या तोंडावर व डोक्यावर वरवंट्याचे वार करत त्यांचा खून केला. खून केल्यानंतर शेखर याने पोलिस ठाण्यात येऊन स्वतः खुनाची कबुली दिली आहे . घटनेचा पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव करीत असल्याचे समजते.


शेअर करा