धक्कादायक..दारापुढे भीक मागणाऱ्या व्यक्तीचा केला खून , महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना धुळे येथे उघडकीस आली असून दारापुढे येऊन भिक मागत असल्याचा राग आल्याने एका संतप्त व्यक्तीने भिकाऱ्याला काठीने मारहाण केली आणि त्यात हा भिकारी गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. शिरपूर तालुक्यातील होळनांथे या गावात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडलेली आहे. पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला जेरबंद केले आहे.

होळनांथे येथील कालू गणपत पावरा या संशयित आरोपीच्या दारापुढे चैन्या आरशा पावरा ( वय 55 ) हा भिकारी भीक मागण्यासाठी 6 जानेवारी रोजी संध्याकाळी गेला होता. दारापुढे उभे राहून भीक मागत असल्याने कालू पावरा याला त्याचा राग आला आणि आणि त्याने शिवीगाळ करत भिकाऱ्याला काठीने मारहाण केली त्यात भिकाऱ्याच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली.

सदर प्रकार घडल्यानंतर देखील काळू त्याला गटारी जवळ सोडून निघून गेला त्यानंतर चैन्या पावरा याच्या भावाने गावातील पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली आणि चैन्या यास रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी कालु यास अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते .


शेअर करा