लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहितेची ‘ ह्या ‘ कारणावरून प्रियकराने केली गळा आवळून हत्या : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

आपल्या पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर प्रियकरासोबत राहणाऱ्या एका विवाहित महिलेची तिच्या प्रियकरानेच हत्या केल्याची घटना पुण्यातील पिंपरी येथे घडली आहे. ही घटना १९ मे रोजी रात्रीच्या वेळी घडली. सदर महिलेचे तिच्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर महेश मल्हारी खंडागळे (२८) याच्यासोबत सूत जुळले मात्र अखेर त्यानेच तिचा खून केला. आरोपी महेश मल्हारी खंडागळे (२८) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीपासून वेगळे झाल्यानंतर विवाहित महिलेचे पिंपरी येथील कासारवाडी येथे राहणाऱ्या महेश या मुलांसोबत प्रेम संबंध तयार झाले. महेश तिच्यासोबत लग्नाला देखील तयार होता. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी महेशने त्याच्या घरच्यांना देखील तयार केले होते मात्र तिची लग्नाची तयारी नसल्याने त्यांच्यात धुसफूस सुरु होती. लग्नाला तयार नसल्याने महेशने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यावरूनच त्यांचे मंगळवारी भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की महेशने सदर विवाहितेचा गळा आवळून खून केला.

ती मृत झाल्यानंतर काय करावे हे महेशला सुचेना म्हणून त्याने तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला मात्र , पोलिसांना त्याच्या हालचालीवरुन शंका आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे उलटतपासणी केली असता त्याने विवाहितेचा खून केल्याची कबुली दिली.

संबंधित बातम्या

लॉकडाऊनदरम्यान सर्रास सुरु होते मसाज पार्लर,पोलिसी कारवाईत आठजण रंगेहाथ धरले : कुठली बातमी ?
https://nagarchaufer.com/?p=56

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51

अनैतिक संबंधातून कोरोनावर लस म्हणून पूर्ण कुटुंबाला फसवून दिले विष : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=20

‘ ह्या ‘ मराठी अभिनेत्रीचा खासगी फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
https://nagarchaufer.com/?p=70

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89


शेअर करा