नागपूर हादरले..’ तुझ्यासाठी काय पण ‘ म्हणताच रितिक तिला म्हणाला की..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नागपूर येथे उघडकीस आली असून बारावीतील एका विद्यार्थिनीने स्नॅपचॅटवर एका तरुणाशी मैत्री केली आणि त्यानंतर सदर तरुणीने इंटरनेटची व्यवस्थित माहिती नसताना तरुणाला आपले तसले व्हिडिओ शेअर केले आणि त्यानंतर तिच्यासोबत धक्कादायक असा ब्लॅकमेलिंग हा खेळ सुरू झाला.

उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलगी ही अल्पवयीन असून तिचे वय 17 वर्षे आहे. ती मानकापूर मध्ये राहत असून रितिक मिश्रा नावाच्या आरोपी सोबत तिची गेल्यावर्षी स्नॅपचॅट वर ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेम इतके वाहू लागले की पीडित मुलीला आपण काय करतो आहोत याचे भान राहिले नाही आणि तिने त्याच्या नादी लागून सगळ्या मर्यादा स्नॅपचॅटवर पार केल्या.

एकमेकांशी फोन नंबर शेअर केल्यानंतर त्यांच्या तासनतास बोलणे व्हायचे यावरून पीडित मुलीचा सदर तरुणावर विश्वास बसला आणि तिने त्याला स्वतःचे तसल्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले त्यानंतर तो सातत्याने तशा स्वरूपाचे व्हिडिओ तिला मागत गेला. तिला त्याचा त्रास होऊ लागल्याने तिने त्याला टाळणे सुरू केले त्यामुळे रितिक हा संतप्त झाला आणि त्याने तिला ब्लॅकमेलिंगची धमकी दिली त्यानंतर मात्र पीडित तरुणीने त्याला ब्लॉक करून टाकले.

आतातरी रितिक आपला पिच्छा सोडून देईल अशी तिला अपेक्षा होती मात्र त्याने तिच्या मोबाईलमधील संपर्कात असलेले सर्व नंबर काढून त्यातील पीडित तरुणीच्या एका जवळच्या नातेवाईकाला तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवले आणि ‘ तू तिला माझ्याशी बोलायला सांग नाहीतर यापेक्षा देखील गंभीर परिणाम होतील ‘ अशी धमकी दिली.

नातेवाईकांनी हा व्हिडिओ तिच्या आई वडिलांना दाखवला आणि झालेला खरा प्रकार समजून सांगितला. आई-वडिलांचा सल्ला घेत पीडित युवतीने माणकापुर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली आहे असून पोलीस आरोपी रितिक मिश्रा याचा शोध घेत आहेत. आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार रितिक मिश्रा हा महाराष्ट्रातील नसून तो ओडिसा राज्याचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.


शेअर करा