नगर ब्रेकिंग..अखेर ‘ त्या ‘ कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला , 1 जानेवारीपासून होते बेपत्ता

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीस येत असताना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरी ग्रहातील कर्मचारी शिवाजी अण्णा शिंदे ( वय ४२ ) हे 1 जानेवारी रोजी कर्मचारी वसाहतीमधून बाहेर पडले होते मात्र सहा जानेवारीला त्यांचा मृतदेह सकाळी साडेनऊच्या सुमारास विसापूर जलाशयात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

1 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता मी ऑफिसला जाऊन येतो असे पत्नीला सांगून ते निघून गेले होते त्यानंतर ते परत आलेच नाहीत म्हणून त्यांच्या पत्नी मंगल शिंदे यांनी पती गायब असल्याची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवली होती. दरम्यान 6 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास विसापूर कारागृहाचे कर्मचारी विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेले असताना त्यांना एका पुरुषाचा मृतदेह पाण्यात आढळून आला.

कारागृहाचे कर्मचारी राजेंद्र दादा वाघ यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तात्काळ खबर दिल्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार दुधाडे व सहाय्यक फौजदार रावसाहेब शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. सदर मृतदेह हा शिवाजी शिंदे यांचा असल्याची खात्री झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार रावसाहेब शिंदे हे करत आहेत .