नगर ब्रेकिंग..पुण्याला जायचंय तर इतके पैसे मोजा

नोव्हेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या एसपी संपामुळे राज्य परिवहन मंडळाची सेवा पुरती कोलमडली असून सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा खाजगी वाहतूकदारांच्या चांगलाच पथ्यावर पडत असून ट्रॅव्हल चालकांनी मनमानी पद्धतीने नागरिकांची लूट सुरू केली आहे पुण्याला जायचे झाले तरी जवळपास सातशे रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात असून या सर्रास लुटीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तुरळक स्वरूपात एसटी सेवा सुरु आहे मात्र बहुतांश गाड्या बंदच आहेत.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून सरकारच्या कारवाईला देखील कर्मचारी दाद देत नसल्याचे चित्र आहे. काही आगारांमध्ये गाड्या सुटल्या असल्या तरी सदर गाड्यांवर दगडफेक होत असल्याने नागरिक देखील भीतीच्या सावटाखाली आहेत मात्र खासगी वाहतूकदारांची यामुळे चांदी होत असून मनमानी पद्धतीने दर आकारणी केली जात आहे.

खाजगी वाहतूकदारांच्या या मनमानी पद्धतीने होणाऱ्या भाडे आकारणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक पथक नेमण्यात आलेले आहे मात्र अद्यापपर्यंत एकाही वाहनावर कारवाई करण्यात आलेली नाही. संपकाळात प्रवाशांची हेळसांड होऊ नये म्हणून वाहतूक विभागातर्फे खाजगी वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे मात्र वाजवी दरात वाहतूक करावी, असे निर्देश असताना त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. अशावेळी जिल्हा स्तरावर कार्यरत असलेले पथक आणि निरीक्षक नक्की काय करत आहेत ? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.