बीड हादरले..आईला प्रियकरासोबत घरात पाहिल्याने अल्पवयीन मुलाने कोयता काढला अन ..

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बीड शहरात समोर आली असून आईला भेटण्यासाठी आलेल्या आईच्या प्रियकरावर 16 वर्षीय मुलाने कोयत्याने सपासप वार केले आहेत. मुलाच्या या अचानक हल्ल्याने प्रियकर गंभीर जखमी झाला असून रविवारी ही घटना बीड शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत घडलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक अर्जुन कोठुळे ( वय 30 राहणार वरवटी तालुका बीड ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सदर प्रियकर हा बीडमध्ये मजुरी काम करतो. रविवारी संध्याकाळी तो त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असताना प्रेयसीच्या 16 वर्षीय मुलाने तू आमच्या घरी का आला ? अशी विचारणा केली त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले.

भांडणाचे रुपांतर मारामारीत होताच अल्पवयीन मुलाने घरातील कोयता काढून त्याच्या गालावर आणि कानावर गंभीर दुखापत केली. त्यात रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडत असताना विवेक याने आपल्या चुलत भावाला संपर्क केला आणि त्याने तात्काळ जागेवर धाव घेईल जखमी विवेकला रुग्णालयात हलवले आहे .

चुलत भावाने दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलावर शिवाजीनगर ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झालेला आहे. सदर मुलगा हा दहावीत शिकत असून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे सहाय्यक निरीक्षक भारत काळे यांनी म्हटले आहे .