नगर हादरले..’ नवीन पिकअप घेतलाय म्हणून तू..’, महिलेला सांगितला ‘ असा ‘ प्लॅन अन..

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात उघडकीला आली आहे. ज्युस मधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला नगर कोतवाली पोलिसांनी संगमनेर येथून अटक केली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, राहुल शिवाजी वाकळे ( वय 28 राहणार कवठे बुद्रुक तालुका संगमनेर ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून पीडित महिलेने त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आरोपीने ‘ आपण नवीन पिकअप घेतली आहे. तुला भेटून पेढे द्यायचे आहे तू बाहेर येतेस का ? ‘ अशी फोनवरून विचारणा केली त्यानंतर पीडित महिलेने त्याला नकार दिला.

पीडितेचा नकार मिळाल्यानंतर देखील आरोपीने जबरदस्तीने तिला पिकअपमध्ये बसवले आणि ज्यूस पाजण्यासाठी म्हणून तिला बाहेर घेऊन गेला. पीडित महिलेला ज्यूस पाजल्यानंतर आरोपी तिला शहरापासून दूर काही अंतरावर घेऊन गेला आणि ज्युस पाजलेला असल्याने तिथे महिलेला भोवळ आली. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला, असे पीडित महिलेचे म्हणणे आहे.