बायकांची अदला-बदल करणाऱ्या उच्चभ्रूंच्या घाणेरड्या रॅकेटचा भांडाफोड , तब्बल ‘ इतक्या ‘ लोकांचा सहभाग

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना केरळ इथे उघडकीस आली आहे. पत्नींची अदला-बदल करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा केरळमध्ये पर्दाफाश करण्यात आला असून या रॅकेट मध्ये तब्बल १००० पेक्षा जास्त जण सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसही हादरून गेले आहेत . व्हाट्सअँप आणि टेलीग्रामच्या माध्यमांतून हा प्रकार सुरु होता . पत्नींची अदला-बदल करण्याच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या 7 जणांना पोलिसांनी कोट्टायम येथून अटक केली असून 25 हून अधिक लोकांची माहिती पोलीस मिळवत आहेत.

एका महिलेने दिलेल्या तक्रारींनंतर या प्रकाराला वाचा फुटली . आपला पती आपल्याला इतर पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत आहे अशी तक्रार एका महिलेने केली आणि त्यांनंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्याचे ठरवले. केरळ इथे याआधी देखील कायमकुलम इथे अशाच प्रकारच्या एका रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला होता.

कोट्टायम येथील एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली की, आपला पती आपल्यावर दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव टाकत आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या मित्रांना अटक केली आणि त्यांच्या मोबाईलमधील माहिती पाहून पोलिसांना या प्रकाराचा सुगावा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट टेलिग्राम आणि इतर ऑनलाइन मेसेंजर अॅप्लिकेशन्सच्या सहाय्याने चालवले जाते.

चांगनचेरीचे डेप्युटी एसपी आर. श्रीकुमार म्हणाले, “हे लोक आधी टेलीग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सामील व्हायचे आणि नंतर एकमेकांना भेटायचे. आम्ही तक्रारदार महिलेच्या पतीला अटक केली आहे. यामागे एक मोठे रॅकेट आहे आणि आम्ही इतर आरोपींचा शोध घेत आहोत.अटक करण्यात आलेले लोक केरळच्या अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम येथील रहिवासी असून बहुतांश लोक उच्चभ्रू परिवारातील असल्याचे समोर आले आहे .