गुड न्यूज ..इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगची मुदत पुन्हा वाढवली, ‘ ही ‘ आहे शेवटची तारीख

देशात कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि ई फाईल करताना येणाऱ्या अडचणी यामुळे मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरून शकणाऱ्या करदात्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला असून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आता 15 मार्च पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आता तिसऱ्यांदा वाढवली असून उद्योगांना देखील त्यांचे ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठी मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबरपर्यंत होती. त्यानंतर रिटर्न दाखल केल्यास एक ते पाच हजार रुपयांपर्यंतचे विलंब शुल्क आकारण्यात येणार होते मात्र देशभरातील असंख्य करदाते आणि व्यवसायिकांनी कोरोना आपत्ती काळात आणि ई-फायलिंग करत येत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी या पार्श्वभूमीवर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती त्यानंतर केंद्र सरकारने आता 15 मार्चपर्यंत मुदत वाढवून दिलेली असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.