नगर ब्रेकिंग..माजी सैनिकाला महिला अधिकाऱ्याने जाळ्यात ओढले अन ..

महाराष्ट्रात आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे उघड झालेले असले तरी अशी गुन्हेगारी मात्र वाढतच असल्याचे चित्र आहे . नागरिकदेखील रोजच्या बातम्या वाचून यातून काहीच धडा घेत नसल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एका माजी सैनिकासोबत झालेली असून तब्बल 18 लाख रुपयांना या माजी सैनिक आला गंडा घालण्यात आलेला आहे. शॉपिंग डॉट कॉम नावाच्या कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली.

प्रदीप जगन्नाथ देठे ( वय 38 राहणार राजहंस कॉलनी लोणी तालुका राहाता ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देठे हे सैन्यातून निवृत्त झालेले आहे आहेत. त्यांनी क्यूआर कोड च्या माध्यमातून एका कंपनीच्या नावे 18 लाख 39 हजार रुपये जमा केले आहेत मात्र हे बँक खाते आता त्या कंपनीने बंद केले त्यामुळे त्यांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे .

प्रदीप देठे यांचा फेसबुकवर आरोपींशी संपर्क झाला होता त्यावेळी देठे यांना शॉपिंग डॉट कॉम कंपनीच्या महिला अधिकाऱ्यांने देठे यांच्याशी वारंवार संपर्क ठेवत त्यांचा विश्वास संपादन केला तसेच कंपनीची उत्पादने विकल्यानंतर तुम्हाला भरपूर कमिशन मिळेल असा दावा देखील महिलेने केला. सतत संपर्क करत या महिलेने देठे यांना विश्वासात घेतले आणि वेळोवेळी पैसे भरायला लावून त्यांची फसवणूक केली .

उत्पादने विकण्यासाठी सुरुवातीला क्यू आर कोड मधून पैसे पाठवावे लागतील अशी मागणी करत महिलेने गोड बोलून देठे यांच्याकडून वेळोवेळी तेरा लाख दहा हजार रुपये कंपनीच्या खात्यात जमा केले मात्र त्यांचा दहा ते वीस लाखांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने देठे यांनी कंपनीकडे पैसे परत देण्याची मागणी केली मात्र कंपनीने तुम्ही आता दहा ते वीस लाखांच्या टास्क मध्ये आहात, असे सांगून पैसे परत देण्यास नकार दिला.

जर पैसे परत पाहिजे असतील तर तुम्हाला आणखी सात लाख रुपये भरावे लागतील, असे तिकडून सांगितले गेले सांगण्यात आले. इतकी मोठी रक्कम आपल्याकडे नसल्याने फिर्यादी यांनी ‘ मी आत्तापर्यंत भरलेली रक्कम परत द्या ‘, असे सांगितले असता कंपनीने कुठलीच दखल घेतली नाही. देठे यांनी पुन्हा काही रक्कम भरली मात्र हे खाते त्यानंतर अचानक बंद करण्यात आले . देठे त्यांनतर पोलिसात धाव घेतली असून सायबरचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी पुढील तपास करत आहेत.