मुंबईत खळबळ..लिव्ह इनमधून जन्मलेल्या बाळाचे वडील नक्की कोण ? आरोपींची यादी मोठी

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना मुंबई येथे उघडकीस आली असून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिला पार्टनरच्या चार महिन्याच्या मुलीचे अपहरण करत तिची तामिळनाडू येथे पाच लाखांना विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. सदर गुन्ह्यात पोलिसांनी एका टोळक्याला अटक करून केली असता या टोळीत अपहृत झालेल्या बाळाच्या आईसह एकूण 11 जणांचा समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 3 जानेवारी रोजी या बाळाची केअरटेकर असलेल्या अन्वरी शेख यांनी पोलिस ठाण्यात येऊन इब्राहीम शेख ( वय 32 ) याने बाळाला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संध्याराणी भोसले व विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची नियुक्ती करत तपासाला सुरुवात करण्यात आली.

इब्राहिम हा फरार असल्याने पोलिसांनी त्याचा तपास घेत त्याला जेरबंद केले आणि त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने नावे सांगताच पोलिसांनी मालाड, जोगेश्वरी, नागपाडा, सायन, कल्याण, धारावी व ठाणे येथे छापा टाकत दोन महिला आणि चार पुरुषांना ताब्यात घेतले आहे.

बाळाची आईही कामानिमित्त 1-12-2021 पासून बाहेर गेलेली असून ती पुन्हा आलीच नाही. इब्राहिम हा या महिलेचा लिव्ह इन पार्टनर असून तो स्वतःला बाळाचा बाप असे म्हणत आहे. त्यामुळे हे बाळ कोणाचे आहे यासाठी बाळाची डीएनए चाचणी करण्याची पोलिसांची पोलिसांनी तयारी केली आहे. अपहरण केलेल्या चिमुकलीला बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

इब्राहीम याने या बाळाला कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये विकले असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दिलीप तांबे व अभिजित देशमुख यांचे पथक दोन्ही ठिकाणी रवाना झाले आणि सतत चार दिवस तपास केल्यानंतर तामिळनाडूच्या कोईमतूर येथे हे बाळ त्यांना अखेरीस आढळून आले. सदर बाळ खरेदी करणाऱ्या महिलेला देखील पोलिसांनी पाच जणांच्या सोबत अटक केली आहे .