पुणे शहरात बुलीबाई सारखाच प्रकार उघडकीस , आढळले वस्तीतील मुलींचे फोटो अन ..

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली आहे. देशपातळीवर बुली बाई ॲपप्रमाणे एक धक्कादायक प्रकार पुणे शहरात उघडकीस आला असून नग्न महिलांचे शरीर असलेल्या फोटोमध्ये वस्तीतील मुलींचे चेहरे जोडून त्यांचे अश्लील फोटो तयार करणाऱ्या एका तरुणाला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शुभम कैलास आवळे ( राहणार राजीव गांधी नगर, खडकी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एका 19 वर्षाच्या तरुणाने खडकी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दिली होती. फिर्यादी तरुण आणि शुभम आवळे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादीने 9 जानेवारी रोजी दुपारी आरोपीचा मोबाईल सहज बघण्यासाठी घेतला असता त्यातील फोटो पाहून त्याला धक्काच बसला.

आरोपीच्या मोबाइल गॅलरीमध्ये चक्क फिर्यादीच्या बहिणीचे स्क्रीन शॉट केलेले फोटो मोबाईलमध्ये आढळून आले तसेच नग्न महिलांची शरीर असलेल्या फोटोवर वस्तीतील मुलींचे चेहरे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चिटकवण्यात आले होते. आरोपीने केलेला हा धक्कादायक प्रकार पाहून फिर्यादी यांनी तात्काळ खडकी पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी शुभम याने हे फोटो कशासाठी तयार केले आणि आणि त्यांचा आतापर्यंत कुठे गैरवापर केलेला आहे का ? याचा पोलीस शोध घेत आहेत.