नागपूरची विवाहिता कात्रजच्या लॉजवर गेल्याचे कळले, पतीला समजले तोपर्यंत ..

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून नागपूर येथील एका महिलेला पुण्याला येणे चांगलेच भारी पडले आहे. नागपूर येथील एका 36 वर्षीय विवाहितेला नवऱ्यापासून घटस्फोट मिळवून देण्याचे आणि लग्न करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका भामट्याने तिला पुण्यात लॉजवर बोलावून घेतले आणि तिच्यावर बलात्कार करून तिचे सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला. महिलेच्या पतीला जेव्हा सर्व प्रकार कळला त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी समीर बेगमपुरे (रा. पुणे, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून नागपूरची आहे. नवऱ्यासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून तिने दुसरे लग्न करावे या हेतूने एका लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर नाव नोंदवले होते. सदर मॅट्रिमोनी साईटवर तिला समीर बेगमपुरे नावाचा इसम भेटला. फिर्यादी महिलेने त्याला आपली परिस्थिती सांगितल्यावर त्याने घटस्फोट मिळवून देतो आणि त्यानंतर आपण लग्न करूयात असे आमिष दाखवत तिला कात्रज येथील एका लॉजवर येण्यास सांगितले.

जुलै 2021 मध्ये फिर्यादी महिला पुण्यात त्याला भेटायला आली आणि दोघे कात्रज परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये दोघे एकत्र राहिले. दरम्यानच्या काळात आरोपीने फिर्यादी महिलेसोबत शरीर संबंध ठेवले आणि तिला परत नागपूरला पाठवताना तिच्या पर्समधील 108 ग्रॅम वजनाचे तीन लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तिच्या नकळत काढून घेतले फिर्यादी महिला नागपूरला परत गेल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात येताच तिला धक्काच बसला.

नवर्‍याच्या भीतीने तिने झालेल्या या प्रकाराबद्दल कुणाकडे वाच्यता केली नाही मात्र काही महिन्यानंतर बायकोच्या अंगावर दागिने दिसत नसल्याने नवऱ्याने तिला दागिन्याबाबत विचारणा केली असता तिने जे काही घडले ते सांगून टाकले. या सर्व प्रकारानंतर दोघेही पती-पत्नी पुण्यात आले आणि त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे करीत आहेत.