पुण्यात खळबळ..’ माझं चुकतंय ‘, गावातल्या ‘आब्या’ मुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथे उघडकीस आली आहे . इंदापूर तालुक्यातील बोरी इथे एका अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यावर परिसरात एकच खळबळ उडालेली आहे .बुधवारी १२ तारखेला सायंकाळी ५ च्या दरम्यान हा प्रकार हा प्रकार उघडकीस आला असून भवानीनगर पोलिस चौैकीमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धी गजानन भिटे (रा. बोरी, ता. इंदापूर) असे या अल्पवयीन मुलीचे नाव असून सिद्धी बोरी गावातील हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळेत जात असताना गावातील तीन टवाळखोर मुले तिची छेड काढत होते . तिने वारंवार विनंती करून देखील आरोपींवर त्याचा काही फरक पडत नव्हता त्यामुळे अखेर तिने मुलांच्या टवाळखोरी छेडछाडीला कंटाळून बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईट नोट लिहली असून त्यात , ‘ माझं चुकतय पण आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्या करत असून गावातल्या ‘आब्या’ मुळे आत्महत्या करीत आहे ‘ असे चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यानुसार गणेश संतोष कुचेकर, यश अरूण गरगडे व एक अल्पवयीन मुलगा या तिघांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचे वडील गजानन भिटे यांनी भवानीनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे . सदर प्रकरणाचा फौजदार नितीन लकडे हे पुढील तपास करत आहेत.