गळती थांबेना.. गेल्या महिन्यात तब्बल ‘ इतक्या ‘ जणांची भाजपला सोडचिठ्ठी

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून भाजपची उलटी गिनती सुरु झाल्याचे देशात चित्र निर्माण झाले आहे. पश्चिम बंगाल येथील पराभव जिव्हारी लागलेला असतानाच उत्तर प्रदेशात देखील भाजपच्या अडचणी वाढत आहेत . भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशात तर पक्षाला एकामागे एक असे धक्के बसताना दिसत आहेत. मंगळवारी कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षालाही रामराम केला मात्र त्यानंतरही अनेक जण भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत .

गेल्या महिन्याभराचा विचार केला तर एक-दोन नाही तर तब्बल 13 नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्याने आता निवडणूक कशी जिंकायची असे आव्हान पक्षापुढे निर्माण झाले आहे . मोदी लाट ओसरली आहे की पंतप्रधान यांच्यावर आता जनतेचा विश्वासच राहिलेला नाही इतके लोक भाजप सोडत आहेत.

कोणत्या नेत्यांनी सोडली आहे भाजपची साथ ?

  • राधाकृष्ण शर्मा (बदायू जिल्ह्यातील बिल्सी येथून भाजपचे आमदार )
  • राकेश राठोड (सीतापूरचे भाजप आमदार)
  • माधुरी वर्मा (बहराइचमधील नानपारा येथून आमदार)
  • जय चौबे (संत कबीरनगरचे आमदार)
  • राम इक्बाल सिंह (बलियातील चिलकलहर येथून माजी आमदार)
  • जय प्रकाश पांडे (प्रदेश प्रवक्ते)
  • अशोक कुमार वर्मा (भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस)
  • शशांक त्रिपाठी (प्रयागराजमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती)
  • कांती सिंह (भाजपचे माजी आमदार)
  • ब्रजेश मिश्रा (प्रतापगढ येथून भाजपचे माजी आमदार)
  • रमाकांत यादव (आजमगढ येथून माजी खासदार)
  • राकेश त्यागी (बुलंदशहर जिल्हा पंचायत सदस्य)
  • हेमंत निषाद (आग्रा)

ज्या प्रकारे एक एक करुन भाजपचे नेते पक्षाची साथ सोडून समाजवादी पक्ष आणि इतर पक्षात सहभागी होत आहेत ते पाहता येत्या निवडणुकीत समाजवादी पक्ष नक्कीच भाजपसाठी मोठी अडचण निर्माण करु शकतो. समाजवादी पक्षाकडून अधिकाधिक भाजपचे नेते, कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असून दुसरीकडे भाजपसाठी मात्र ही चिंतेची बाब आहे .

उत्तरप्रदेशात एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला, दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी, तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी, चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी, पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी, सहाव्या टप्प्यात 3 मार्च, सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर पाचही राज्यांची 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.


शेअर करा