नगर जिल्ह्यात गाजलेल्या ‘ त्या ‘ प्रकरणात सुवर्णा कोतकर यांना मोठा दिलासा

शेअर करा

नगर शहरानजीक केडगाव येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडात आरोपी असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना जिल्हा न्यायालयाने गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सुवर्णा कोतकर या पावणे चार वर्षांपासून फरार होत्या.

जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद कुर्तडकर यांच्यासमोर सुवर्णा कोतकर यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी झाली त्यात कोतकर यांच्यावतीने एडवोकेट महेश तवले व सागर वावळ यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने केदार केसकर यांनी युक्तिवाद केला होता.

एडवोकेट महेश तवले यांनी यादरम्यान सुवर्णा कोतकर यांचा प्रत्यक्ष कटात सहभाग नव्हता ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ग्राह्य मानत सुवर्णा कोतकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

नगर महापालिका पोटनिवडणुकीत दरम्यान ७ एप्रिल २०१८ रोजी दोन शिवसैनिकांची केडगाव येथे अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणी दोषारोपपत्रात हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप सुवर्णा कोतकर यांच्यावर ठेवण्यात आला होता. नगर जिल्ह्यासह पूर्ण राज्यात हे प्रकरण चांगलेच गाजले होते.


शेअर करा