मुंबईत खळबळ..बायको ‘ तसला ‘ व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवणारा पती अखेर धरला

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना मुंबई नजीक भिवंडी इथे उघडकीस आली असून चक्क एका पतीने स्वतःच्या बायकोचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हाट्सएप्प स्टेटलला ठेवल्याने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत . मुंबईजवळच्या भिवंडी भागात हा धक्कादायक प्रकार घडलेला असून त्याचे हे घृणास्पद कृत्य महिलेला समजल्यानंतर तिने मुंबईतील मालाडमधील कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत सासरच्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कुरार गावातील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय महिलेने 2015 मध्ये भिवंडीतील एका तरुणाशी लग्न केले होते. लग्नानंतर काही वर्षातच त्यांना जुळी मुले देखील झाली . मुलीच्या वडीलांनी तिचे लग्न अगदी थाटामाटात लावून दिले होते मात्र तरीही सासरच्या मंडळींनी तिला हुंड्यासाठी त्रास देणे सुरु केल्याने अखेर ती वैतागून कुरार येथे राहणाऱ्या आई-वडिलांकडे आली होती

पीडितेच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी जानेवारीत एके दिवशी जेव्हा दोघे ठाण्यात एकत्र राहत होते त्यावेळी आरोपी पतीने कथितरित्या तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि काही महिन्यांपूर्वी ती घर सोडून गेली तेव्हा नवऱ्याने सासरी परत न आल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. पीडित पत्नीने त्याच्या धमकीला दाद दिली नाही म्हणून आरोपीने चक्क तिचा तसला व्हिडीओ व्हाट्सएप्प स्टेटसला ठेवून दिला.

गेल्याच आठवड्यात पीडितेच्या लहान बहिणीने आरोपीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तिच्या बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाहिला आणि तिला सांगितले. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 498A (महिलेसोबत क्रौर्य), 506, 2 (गुन्हेगारी धमकी) यासह कलम 67A आणि 34 अंतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.