नगर ब्रेकिंग..अखेर ‘ त्या ‘ व्यक्तीचा खूनच झाल्याचे निष्पन्न

शेअर करा

नगर शहरातील बंगाल चौकी रस्त्यावर चाळीस वर्षीय पुरुष काही महिन्यांपूर्वी जखमी अवस्थेत आढळून आला होता . रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. सदर व्यक्तीची जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली असता त्याच्या डोक्यावर टणक वस्तूंमुळे प्रहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महिला पोलिस अधिकारी वैशाली पठारे यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली असून कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरातील बंगाल चौकी ते धरती चौक रस्त्यावरील श्रद्धा इमारतीसमोर 29 सप्टेंबर 2021 रोजी एक अनोळखी व्यक्ती जखमी झालेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता काही कालावधीतच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वैशाली पठारे या करत होत्या. जिल्हा रुग्णालयाकडून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असता त्याचा मृत्यू हा टणक वस्तूने प्रहार केल्यामुळे तसेच डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याने झाला असल्याचे समोर आले आहे. सदर व्यक्ती कोण होता आणि हा प्रकार कशामुळे घडला ? हे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे आहे .


शेअर करा