फॉलोअर्स वाढवण्यासाठी पत्नी ‘ असे काही ‘ करायला लावत असल्याची पतीची तक्रार : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

टिकटॉक बंद झाले असले तरी त्याला पर्याय म्हणून असलेल्या ऐपवर टिकटॉक स्टार्सची उपस्थिती कायम आहे .सोशल मीडिया प्लॅटफार्मवर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे मात्र अशा वेळी आपली उपस्थिती ठळकपणे दिसून यावी म्हणून हे स्टार्स वेगवेगळे हातखंडे अवलंबत असतात.टिकटॉकवर स्टार असलेल्या पत्नीच्या पतीने आपल्या पत्नीवर असेच काही धक्कादायक आरोप केले आहेत .मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील ही बातमी असून आपली पत्नी अ‍ॅपवर फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी आपल्याकडून चित्रविचित्र करामती करवून घेते, असा आरोप एका त्रस्त पतीने केला आहे.

सदर व्यक्तीचे म्हणणे आहे की, लग्न झाल्यापासूनच त्याच्या पत्नीला टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याचा छंद होता. सुरुवातीला नवीन नवीन लग्न झाले असल्याने मला देखील बरे वाटायचे आणि तिच्या हट्टापोटी मलाही असे व्हिडीओ तयार करण्यात कुठलीही अडचण वाटत नव्हती, मात्र नंतरच्या काळात पत्नी माझ्याकडून डाएटिंग करवून घ्यायला लागली. तसेच चित्रविचित्र करामती करायला सांगू लागली आणि या सगळ्याचा उद्देश म्हणजे मी आणि ती व्हिडिओमध्ये चांगले दिसावे म्हणून ..

व्हिडीओत स्लीम दिसावं म्हणून पत्नी मला अनेकदा उपाशी ठेवायची. प्रश्न विचारल्यास माझ्यासोबत भांडण करायची त्यानंतर आम्ही एकदा समुपदेशन केंद्रात गेलो. तिथे गेल्यानंतर काही काळ तिच्यात बदल झाला मात्र आता पुन्हा तो प्रकार घडू लागल्याने मी मानसिक त्रासात आहे मात्र आता पुन्हा एकदा पत्नीने नव्या अ‍ॅपवर फॉलोअर वाढवण्यासाठी पतीकडून चित्रविचित्र कारनामे करवून घेण्यास सुरुवात केली.

व्हिडिओमध्ये वेगळेपण यावे म्हणून माझी पत्नी कधी कधी मला चित्रविचित्र मेकअप करायला लावते, तर कधीकधी कुठल्यातरी गाण्याच्या तालावर नाचायला लावते. अर्थातच हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर देखील होतात त्यामुळे ऑफीसपासून नातेवाईकांपर्यंत सर्वजण माझी मस्करी करतात. मात्र माझी पत्नी माझे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही.

याबाबत मानसोपचार तज्ज्ञ शैला अवस्थी यांनी याबद्दल सांगितले की, टिकटॉक बंद झाले तर ही महिला चिंगारीवर ऍक्टिव्ह झाली.अ‍ॅपवर आपले फॉलोअर्स वाढावेत म्हणून ही महिला आपल्या पतीवर दबाव आणून त्याच्याकडून चित्रविचित्र व्हिडीओ चित्रीत करून घेते. एवढेच नाही तर स्वत:ला स्लिम ठेवले नाही तर नवीन मित्रमंडळी बनवून त्यांच्यासोबत व्हिडीओ बनवेन अशी धमकी ती पतीला देते. दरम्यान असा तगादा लावणे बंद करण्याचा सल्ला मी तिला दिला आहे. दरम्यान, दोघांचेही समुपदेशन सुरू आहे .


शेअर करा