संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर कारवाईत तब्बल ‘इतके ‘ किलो गोमांस जप्त

शेअर करा

नगर जिल्ह्यातील संगमनेर शहर कत्तलखान्याचे शहर म्हणून ओळख बनू पाहत आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर याआधी शहरातील अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई झाली होती मात्र वातावरण शांत होतात नव्या जोमाने हे कत्तलखाने सुरू झाले असून मकर संक्रांतीच्या दिवशी 14 तारखेला संध्याकाळी सहा वाजता शहर पोलिसांनी जमजम कॉलनीत मोठी कारवाई करत तब्बल 37 हजार 500 रुपयांचे गोमांस जप्त केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अब्दुल हमीद अहमद कुरेशी ( वय 26 ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. शुक्रवारी जमजम कॉलनीत जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांच्या माध्यमातून मिळाली होती, त्यानंतर पोलीस आणि पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी कारवाई स्थळी कारवाई करून घटनास्थळावरून सुमारे अडीचशे किलो गोमांस आणि दोन सुरे जप्त केले आहेत.पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अमित महाजन करत आहेत .


शेअर करा