नगर मार्केट यार्डमधील ‘ त्या ‘ मालकावर अखेर कोतवालीत गुन्हा दाखल

शेअर करा

नगर शहरातील मार्केट यार्ड येथे एका लिफ्टमधून अवजड साहित्याची वाहतूक करणाऱ्या कामगारांना दुकान मालकाने संरक्षणाची साहित्य दिले नाही आणि मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुकानातील कामगार शिवम भाऊसाहेब झेंडे ( वय 19 राहणार चिखली तालुका श्रीगोंदा ) हा मयत झाला त्यामुळे शिवमचे वडील भाऊसाहेब एकनाथ झेंडे ( वय 50 राहणार चिखली )यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात मार्केट यार्ड येथील अभय मशिनरीचा मालक आरोपी अभय रसिकलाल लूनिया ( राहणार मार्केटयार्ड ) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बाजार समितीच्या आवारातील अभय मशिनरी या दुकानात मटेरियल ने-आण करण्यासाठी एक लिफ्ट बसवली होती. शनिवारी पंधरा तारखेला दुसऱ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळल्याने शिवम झेंडे नावाचा तरुण मयत झाला तर इतर तीन जण देखील जखमी झाले आहेत. ओमकार अरुण निमसे ( वय 19 ), प्रिया सचिन पवार ( वय 40 ) , शितल शेषराव चिमखडे ( वय 24 ) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फिर्यादी भाऊसाहेब झेंडे गेल्या वीस वर्षांपासून याच दुकानात कामाला आहे. त्यांचा मुलगा शिवम देखील इथेच कामाला होता. तो कामाला आलेला असताना दुकानदार मालक लुणिया यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान कामगारांनी जास्तीचे बॉक्स लिस्टमध्ये ठेवलेले होते त्यातूनच ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. आरोपी अभय लुणिया याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा