कल्याणची विवाहिता बीडमध्ये रात्री प्रियकराच्या घरात आढळली , पतीला समजले तोपर्यंत ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना बीड इथे उघडकीस आली असून आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी महिला कल्याणवरून आली होती मात्र सदर प्रकारची माहिती महिलेच्या पतीला झाली आणि पतीने तिला फोन करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.आता आपले काही खरे नाही असे समजून तिने अन प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्लॅन केला आणि पुढे जे घडले ते होते महाभयानक होते ..

कल्याण येथील एका तीस वर्षीय विवाहीत महिलेसोबत फेसबुकवरुन जयपाल लक्ष्मण वाव्हळ (वय २७, रा.भेंड बुद्रुक, ता.गेवराई) याचे सोबत प्रेम जुळून आले होते. सुरुवातीला ते फक्त फेसबुकवर बोलत असत मात्र काही कालावधी गेल्यावर त्यांनी एकमेकांना आपले नंबर शेअर केले आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेम फुलत गेले. दोन दिवसांपूर्वीच ही विवाहीत महिला प्रियकराला भेटण्याच्या आशेने भेंड बुद्रुक येथे आली होती आणि याचदरम्यान महिलेच्या पतीला या प्रकाराच माहिती झाली आणि त्याने तिला फोन करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

पतीने दिलेल्या या धमकीने महिला घाबरून गेली आणि आता प्रियकरासोबत आपण राहू शकत नाही या कल्पनेने खचून गेली मात्र आता आपण सोबत राहू शकत नाही तर सोबत मरू तरी शकतो असा विचार करत या प्रेमीयुगुलाने आत्महत्येचा प्लॅन केला आणि रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवारी (ता १७) पहाटे घरातील ऍंगलला या प्रेमी युगलाने गळफास घेतला मात्र विवाहीत महिलेच्या वजनाने महिलेचा दोर तुटला मात्र जयपाल वाव्हळ याचा यामध्ये मृत्यू झाला.तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून एम.डी.कुवारे पुढील तपास करित आहेत.


शेअर करा