नगर ब्रेकिंग..पंधरा ते वीस जणांचा रिंगण करून सुरु होता ‘ भलताच ‘ प्रकार

शेअर करा

नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एक वेगळीच घटना समोर आलेली असून कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळणाऱ्या चार जणांच्या विरोधात पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन कोंबडे जप्त करण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लिलावात हे कोंबडे पाच हजार शंभर रुपयांना विकण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी माळीबाभुळगाव शिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना समजली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील पथक घेऊन तिथे पोहोचले असता पंधरा ते वीस तरुण गोलाकार रिंगण करून कोंबड्यांच्या झुंजीची मजा पाहात त्यावर बोली लावत होते.

पोलीस आल्याचे पाहून त्यांची चांगलीच पळापळ झाली मात्र पोलिसांनी झुंजी लावणाऱ्या करीम समीर सय्यद ( राहणार औरंगाबाद ), अनिस रफिक शेख ( राहणार येवला ), ओमकार कैलास चव्हाण ( राहणार पुणे ) यांना पकडले आणि त्यांच्याकडील वाहने तसेच मोबाईल रोख रक्कम आणि तीन कोंबडे जप्त केले केले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता तनवीर शफिक शेख ( राहणार पाथर्डी ) याच्या सांगण्यावरून आम्ही हा जुगार लावत होतो असे सांगितल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सागर मोहिते यांनी या चार जणांसह अन्य दहा ते बारा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यादरम्यान पकडण्यात आलेले कोंबडे देखील चांगलेच सशक्त होते त्यामुळे त्यांना लिलावात उभे केले असता त्यांचे पाच हजार शंभर रुपये त्यांना विकल्यानंतर सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत.


शेअर करा