‘ स्वर्णव ‘ सुखरूप सापडला मात्र अपहरणकर्ते नक्की पळाले कसे ?

शेअर करा

पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली होती. बालेवाडी परिसरातून अपहरण झालेल्या चार वर्षाच्या स्वर्णवचा शोध लागला असून दहा दिवसानंतर पुनावळे येथे तो सापडला आहे. अपहरणकर्ते पळून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दहा दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते. त्याच्या शोधासाठी सोशल मीडियावर अनेकांनी आवाहन केलं होतं मात्र अखेर हा मुलगा सुखरुप घरी परतला आहे.

काय आहे प्रकरण ?

पुण्यासारख्या शहरात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ एक व्यक्ती या मुलाला काळ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवर घेऊन जात असल्याचे दिसत होते . त्याच्याच आधारावर तपास सुरू करत पोलिसांनी अखेर या मुलाला शोधून काढले आहे. पुणे पोलिसांपुढे सदर प्रकरणाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान होते.

पुणे शहरातील वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये या मुलाचे फोटो व्हायरल केले जात होते तसेच पालक यांचे नंबर देखील देण्यात आले होते. १७ तारखेला देखील मुलाच्या वडिलांनी भावनिक आवाहन करत ‘ तुम्हाला हवं ते देतो फक्त माझा बाळ मला द्या ‘ असे म्हटले होते . आमच्या कठीण काळात आमच्यासाठी प्रार्थना करण्याचे देखील आवाहन त्यांनी केले होते. स्वर्णवचा शोध लावणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान बनून राहिलेले होते. .

सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ एक व्यक्ती या मुलाला काळ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवर घेऊन जात असल्याचे दिसत होते . त्याच्याच आधारावर तपास सुरू होता त्याला यश आले असून अखेर स्वर्णव सापडला असल्याने पालकांचा जीव भांड्यात पडलेला आहे .अपहरण झालं त्यावेळी त्यानं निळ्या रंगाचा टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेली होती. नागरिकांना अपहरणकर्ता किंवा स्वर्णव चव्हाण यासंदर्भात काही माहिती मिळाल्यास ती पोलीस किंवा चव्हाण कुटुंबीयांकडे द्यावी, असं आवाहन सर्व स्तरावर करण्यात येत होते.

असा सापडला स्वर्णव ?

सोशल मीडियावरून अपहरणाची पसरलेली माहिती यातून अपहरणकर्त्याने स्वतःच घाबरून मुलाला सोडून पलायन केले. आज बालेवाडी येथील पुनावळे परिसरातील एका कंपनीजवळ त्याला अपहरणकर्ता घेऊन आला आणि तिथे बसलेल्या कामगारजवळ बालकाला सोडले आणि ‘ अन मी दहाच मिनिटात आलो ‘ म्हणून तो अपहरणकर्ता गेला मात्र तो परत आलाच नाही म्हणून कामगाराला शंका आली.

मुलगाही रडू लागल्याने कामगाराने त्याची पिशवी पाहिली असताना त्याला त्यात आई वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळाला. कामगाराने या नंबरवर संपर्क साधला असता पालकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. मुलगा तोच आहे का ? हे पाहण्यासाठी व्हिडीओ कॉल केला आणि त्याची खात्री होताच पोलिसांनी पालकाच्या मदतीने घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळावर मुलगा आढळल्याने मुलाच्या आईवडिलांच्या जीवात-जीव आला असून अपहरण कर्त्यांचा नक्की उद्देश काय होता आणि कुणी अपहरण केले यांचा पोलीस शोध घेत आहेत.


शेअर करा