नगर ब्रेकिंग.. सैनिक बॉर्डरवर अन त्यांच्या प्लॉटवर डोळा ? , अखेर तोडगा निघाला

शेअर करा

महाराष्ट्रातील बहुतांश भागात रिकाम्या प्लॉटवर परिसरातील गुंडांचा डोळा असल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. नगर शहरानजीक दरेवाडी येथे असाच प्रकार समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ दरेवाडीमधील करांडे मळ्यात आपण खरेदी करून घेतलेल्या प्लॉटवर गावगुंड जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आजी-माजी सैनिकांनी उपोषण सुरू केले होते. तहसीलदार उमेश पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सैनिकांच्या मदतीसाठी आपण कायम तत्पर असल्याचा प्रत्यय तहसीलदार उमेश पाटील यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दिला आहे .

काय आहे प्रकरण ?

दरेवाडी येथील जामखेड रोडवर करांडे मळा 20 ते 25 आजी-माजी सैनिकांनी काही दिवसांपूर्वी जागा खरेदी केलेली आहे. त्यातील काही सैनिक सध्या सीमेवर कार्यरत आहेत तर काही माजी सैनिक आहेत. नगर शहरातील जागांचे भाव वाढत असल्याने काही परिसरातील स्थानिक गुंड ही जागा आमचे असल्याचे सांगून बळकावण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे सैनिकांनी धरणे आंदोलन सुरू केले होते.

सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जागा ही सर्व सैनिकांनी कायदेशीर पद्धतीने खरेदी केलेली आहे. सातबाऱ्यावर त्यांची नावे देखील लागलेली आहे असे असताना देखील दरेवाडी येथील काही स्थानिक गुंड ही जागा आमचीच आहे असे सांगत बळकावण्याचा प्रयत्न करत होते. एकीकडे सैनिक सीमेवर कार्यरत असताना दुसरीकडे त्यांना दिल्या जाणाऱ्या उपद्रवाच्या विरोधात सैनिक आणि त्रिदल सैनिक सेवा संघ यांच्यावतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

शहरात या आंदोलनाची चांगलीच चर्चा होऊ लागल्यानंतर तहसीलदार उमेश पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक आणि जागेवर हक्क सांगणार्‍या इतर व्यक्तींचे देखील म्हणणे ऐकून घेतले. त्यामध्ये सुमारे तीन तास चर्चा झाल्यानंतर सध्या जी बांधकामे सुरू आहे ती तशीच सुरू ठेवा आणि ज्या जागेबाबत वाद सुरू आहे त्या जागेची पुन्हा मोजणी करा, असे मत तहसीलदार यांनी व्यक्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे तसेच सुरु असलेल्या बांधकामावर कोणी आडकाठी करू नका असे देखील तहसीलदार उमेश पाटील यांनी स्थानिक व्यक्तींना बजावले आहे.


शेअर करा