नगरमध्ये खळबळ..महिला पोलिसाला भर रस्त्यात अडवले मात्र कोतवाली पोलीस पोहचले अन ..

शेअर करा

महाराष्ट्र अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नगर शहरानजीक उघडकीस आली आहे. गुन्हेगार किरकोळ कारणावरून देखील कायदा हातात घेत असल्याची ही घटना समोर आल्यानंतर नगर पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नगर येथून मोटारसायकलवरून संध्याकाळी घरी जात असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला एका इसमाने भर रस्त्यात अडवले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कल्याण रोड परिसरात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.प्रशांत माधव महाजन ( राहणार गोळेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे ) या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात पीडित महिला कर्मचाऱ्याने फिर्याद दिलेली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘ फिर्यादी ड्युटी संपवून कल्याण रोडवरुन भाळवणीला घरी जात असताना आरोपी प्रशांत महाजन याने त्याची मोटारसायकल एम एच बारा जी एक्स 87 26 आडवी घातली आणि फिर्यादीला शिवीगाळ करायला सुरु केली त्यानंतर एका टणक वस्तूने फिर्यादीच्या हातावर आणि पाठीवर आरोपीने मारहाण केली. आपल्या सोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादी यांनी तात्काळ कोतवाली पोलिसांना फोन करून सदर प्रकाराची माहिती दिली. कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या


शेअर करा