नगर ब्रेकिंग..’ तुझं काम पुण्याच्या पोरांना दिलंय ‘, म्हणत केला गोळीबार

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात चापडगाव येथे घडलेली असून दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी एका युवकावर 22 तारखेला शनिवारी सकाळी दहा वाजता गोळीबार केला आहे. त्यांच्या गोळीबारात दोन युवक किरकोळ जखमी झाले असून सदर घटनेप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, परमेश्वर पातकळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गावातील काकासाहेब वैद्य, दत्तात्रय वैद्य यांनी घरी येऊन मित्रांसोबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी का गेला ? असे म्हणत परमेश्वर पातळ त्यांच्या आईला मारहाण केली होती त्यावरून शेवगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून वैद्य बंधूंनी पातकळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

शनिवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास चापडगाव इथे हायस्कूल रस्त्यावरील ड्रायक्लीनरच्या दुकानात पातकळ हे शर्ट इस्त्री करून घेत असताना तिथे दोन दुचाकी उभ्या होत्या. त्यावेळी प्रभू वाडगाव येथील अरविंद उर्फ पप्पू दराडे हा त्यांच्याजवळ आला आणि ‘ तुझे काका वैद्य सोबत भांडण मिटले का ? तुझे काम वीस लाख रुपयांना पुण्याच्या पोरांना दिले आहे. तू नाटक करू नकोस’ असे म्हणत त्याच्या सोबत असलेल्या मुलाला इशारा केला त्यानंतर अरविंद दराडे याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून पातकळ याच्या अंगावर गोळी झाडली मात्र पातकळ यांना किरकोळ जखम झाली तर दुसऱ्या एका व्यक्तीने आणखी एक गोळी त्यांच्या दिशेने झाडली मात्र ती गोळी अनोळखी इसमास लागून ते किरकोळ जखमी झाले.

पातकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरविंद दराडे, काकासाहेब वैद्य, दत्तात्रय वैद्य इतर चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शेअर करा