महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी ? नाशिकच्या ‘ त्या ‘ प्रकरणात मोठी घडामोड

शेअर करा

एखादा माणूस कितीही मोठ्या पदावर गेला तरी त्याच्या अंगातील दुर्गुण मात्र कधी जात नाहीत असेच एक प्रकरण नाशिक इथे समोर आले होते . नाशिक जिल्ह्यातील येवला येथील प्रांतअधिकारी सोपान कासार याने एका महिला तलाठ्याकडे चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता . महिला तलाठयाने केलेल्या या खळबळजनक आरोपानंतर नाशिक महसूल विभागात चांगलीच खळबळ उडालेली होती मात्र आता या प्रकरणात प्रांतअधिकारी म्हणून कार्यरत असलेले सोपान कासार याची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली आहे .

काय आहे प्रकरण ?

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील वर्ग एक पदावर प्रांतअधिकारी म्हणून सोपान कासार यांची नियुक्ती करण्यात आली होती.पीडित तलाठी महिलेच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या वर्षी काही कामानिमित्त कासार याने एका महिला तलाठ्याला घरी बोलावले आणि त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. वरिष्ठांकडे तक्रार केली असताना चक्क महिला तलाठ्याचीच बदली करण्यात आली त्यामुळे मात्र या प्रकाराची आणखीनच चर्चा झाली आणि चौकशीसाठी हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपवण्यात आले.

विशाखा समितीने तक्रारदार महिला तलाठी आणि प्रांतअधिकारी कासार या दोघांचेही जबाब नोंदवले आणि दोघांना समोरासमोर बसवून उलट तपासणीही केली असताना त्यांना या तक्रारीत तथ्य आढळल्याचे समोर आले. अखेर त्यांनी प्रांतअधिकारी कासारवर कारवाई करावी, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची शिफारस आयुक्तांकडे केली आणि त्यांनतर आयुक्तांनी याप्रकरणी तातडीने दखल घेत कासार याची वर्धा येथील भूसंपादन उपजिल्हाधिकारी पदावर बदली केली आहे .


शेअर करा