बायकोसोबत मित्र आत तर पती चौकीदार , प्रकरणाला अत्यंत ‘ वेगळंच ‘ वळण

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना हिंगोली इथे उघडकीस आली होती. आपल्या पत्नीवर चक्क मित्राच्या मदतीने पतीनेच बलात्कार घडवून आणला अशी फिर्याद पोलिसात देण्यात आली होती मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळालेले असून पीडित महिलेचे व तिचा प्रियकर ( माधव जोगदंड ) यांचे गेल्या वर्षभरापासून संबंध असून पती विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थ व गावातील महिलांनी केला आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन समस्त ग्रामस्थांच्या मदतीने निवेदन देखील देण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?

हिंगोली तालुक्यातील सवड येथे गुरुवारी आरोपी व्यक्तीची पत्नी रात्री दहा वाजता घरात एकटी असताना पतीने त्याचा मित्र असलेल्या एका व्यक्तीला स्वतःच्या घरी पाठवले आणि पत्नीवर अत्याचार करण्यास त्याला मदत केली असा ठपका ठेवत पती आणि त्याच्या मित्रावर हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सवड येथील ही महिला गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घरी एकटीच होती त्यावेळी फिर्यादी महिलेचा पती तिथे माधव जोगदंड ( महिलेच्या म्हणण्याप्रमाणे पतीचा मित्र ) नावाच्या व्यक्तीला घेऊन आला आणि तो घराच्या बाहेर थांबला तर माधव याला त्याने घरात पाठवले. माधव याने चाकूचा धाक दाखवत फिर्यादी आणि तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरी अत्याचार केला, अशी फिर्याद महिलेने पोलिसात दिली होती.

सदर प्रकरण पोलिसात जाताच महिलेच्याच विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आणि महिलेच्या पतीला यात गोवण्यासाठी महिलेने हा खेळ केला असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे . महिलेच्या पतीसह जोगदंड याच्यावर गुन्हा दाखल असून जोगदंड याचेच या महिलेशी संबध होते असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत या प्रकरणाचा भांडाफोड केला तर आहेच पण पूर्ण गाव पतीच्या बाजूने उभे राहिलेले पाहायला मिळते आहे तर माधव जोगदंड हा महिलेच्या पतीचा नव्हे तर तिचाच मित्र आढळून आल्याने प्रकरणाला वेगळेच वळण लागलेले आहे .

गावकऱ्यांनी दिलेले काय आहे निवेदन ?

१९ जानेवारी रोजी संबंधित महिलेचा पती हा पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला असताना रात्री १० ते १०:३० च्या सुमारास संबंधित महिलेने तिचा प्रियकर माधव जोगदंड यास घरी बोलावून घेतले. पीडित महिला व माधव जोगदंड घरात असल्याची बाब गावकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांच्या घरासमोर मोठा जमाव जमला मात्र अचानक लाईट गेल्याने पती पुन्हा घरी आला असताना हा सर्व प्रकार पतीने पाहिला म्हणून महिलेने हा बनाव रचला आहे .

पतीवर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा खोटा असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, अनुसया बोरकर, सविता राउत, विलास थोरात, शिवाजी थोरात, माधव थोरात, केशव कुबडे, नामदेव पडोळे, विकास जोजार, केशव जोजार, गजानन डांगे, नागोराव कोल्हापुरे, केदारलिंग जोजार, केदार बेरडे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


शेअर करा