‘ असे म्हणून स्वतःची पाठ ते थोपटून घेतात ‘, मोनिकाताई राजळे यांचा हल्लाबोल

शेअर करा

‘ प्रशासनाकडे पाठपुरावा करून विविध योजनांसाठी आम्ही निधी आणतो मात्र निधी आणल्याचे समजतात विरोधक राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे म्हणून हा निधी आम्ही आणला ‘ असे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याची टीका आमदार मोनिका राजळे यांनी प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता केली आहे दुलेचांदगाव येथे ग्रामसंसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

काय म्हणाल्या मोनिकाताई राजळे ?

अतिवृष्टीत अनेक गावातील बंधारे वाहून गेल्याने मोठे नुकसान झालेले आहे. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचे काम आपण करत आहोत. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी तालुक्याला जलयुक्त शिवार योजनेसाठी मोठा निधी देऊन ठाकरे सचिवालय योजना आणली होती या योजनेमुळे आता प्रत्येक गावात ग्रामपंचायतीचे चांगली इमारत उभी राहणार आहे.

अतिवृष्टीमुळे ज्या बंधाऱ्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे आपण करून घेतले. लवकरच या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देखील मिळणार आहे. गेली पाच वर्ष तुमच्या विश्वासाला पात्र राहील अशा पद्धतीने आपण काम केलेले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यात विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका .


शेअर करा