पुण्यात कामगार महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या असिस्टंट मॅनेजर ‘ जॅक्सन ‘ ला अटक

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे .कामाच्या ठिकाणी महिलांना अनेकदा आपल्यासोबत होत असलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शोषणाला बळी पडावे लागते मात्र महिला आता शांत न बसता त्याविरोधात आवाज उठवतात आणि आरोपीना गजाआड होण्याची वेळ येते. पुणे शहरानजीक पिंपरी इथे अशीच एक घटना उघडकीस आली असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, म्हाळुंगे येथील व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीत हा प्रकार १२ डिसेंबर २०२१ ते १९ जानेवारी २०२२ या कालावधीत घडलेला असून आरोपी असिस्टंट मॅनेजरला अटक करण्यात आली आहे . कंपनीत काम करणाऱ्या कामगार महिलेसोबत सतत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग आरोपी करत होता.

जॅक्सन अरुण अल्हाट (वय ३४, रा. भैरवनगर, धानोरी रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे . आरोपी आपल्या पदाचा वापर करून महिलेला मोबाईवर अश्लील मेसेज पाठवायचा तसेच त्यांच्यासोबत अश्लील चाळे देखील करत होता.

पीडित महिला ह्या व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीत काम करतात आणि तिथेच आरोपी जॅक्सन अरुण अल्हाट हा असिस्टंट मॅनेजर पदावर काम करत होता. काम करत असताना आरोपी हा पीडित महिलेला अश्लील मेसेज पाठवायचा . पीडितेने काही काळ त्याच्याकडे दुर्लक्ष केले मात्र तरीदेखील तो त्यांच्याशी अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग करू लागला आणि नंतर तर पीडित महिलेने हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देत होता म्हणून अखेर पीडित महिला यांनी पोलिसात धाव घेतली.


शेअर करा