पुणे हादरले..तक्रारदार महिलेच्याच हातावर ‘ नितीन ‘ पीएसआयचा टॅटू , नेमकं काय घडलंय ?

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातून उघडकीस आली असून सदर पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याने पोलीस दलाची बदनामी झालेली आहे. बारामती येथील एका पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिचा संसार अडचणीत आणला आणि पतीने याबद्दल विचारणा केली असता त्याने पतीसोबत चक्क हातपाय तोडण्याची भाषा वापरली. हतबल झालेल्या पतीने अखेर पोलिस अधीक्षक यांच्याकडे या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , बारामती तालुक्यातील एका गावात हे कुटुंब वास्तव्यास असून या महिलेचा विवाह 22 ऑगस्ट 2010 रोजी झालेला असून तिला दोन मुली देखील आहेत. जून 2021 मध्ये ही महिला आणि पतीच्या एका नातेवाईकांमध्ये वाद झाला होता. सदर वादाची तक्रार नोंदवण्यासाठी महिलेने पतीसोबत पोलिस ठाण्यात धाव घेतली त्यावेळी हा पीएसआय तिथे हजर होता.पीएसआय यांनी समोरील व्यक्तीला देखील बोलून घेतले आणि त्यानंतर कागदोपत्री तडजोड करून हा वाद मिटविण्यात आला मात्र दरम्यानच्या काळात या पीएसआयने तक्रारीत दिलेला फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिच्याशी संपर्क करणे सुरू केले.

दरम्यानच्या काळात ती महिला एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहे अशी त्याला माहिती मिळाली आणि त्यासाठी त्याने तुला हवी ती मदत करेल असे सांगत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एमपीएससीच्या तयारीसाठी तुला बारामतीत राहून तयारी करता येणार नाही त्यासाठी तुला पुण्याला जावे लागेल असे सांगितले आणि नोव्हेंबर 2021 मध्ये चक्क महिलेच्या पतीने बारामती येथून तिला आपल्या सोबत घेतले आणि पुणे येथे या पीएसआयच्या नातेवाईक असलेल्या एका व्यक्तीच्या घरी तिला नेऊन सोडले. काही कालावधीत महिलेचा कुटुंबाकडे संपर्क कमी होत असल्याचे पतीला जाणवायला लागला .

16 जानेवारी रोजी सदर महिलेच्या हातावर नितीन नावाचा टॅटू तिच्या पतीला दिसून आला आणि त्यावरून पती-पत्नीचा वाद झाला. पीएसआयने त्या महिलेच्या पतीला फोन करून ‘ तिला मंगळवारी घेऊन ये तसेच तिला हात लावू नकोस नाहीतर तुझे हात पाय मोडेन ‘ असा दम देतानाचा ऑडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे तसेच पीएसआय सदर महिलेला आपल्या कंपनीत 10 टक्के भागीदारी देणार असे देखील सांगत असल्याचा हा ऑडिओ आहे.


शेअर करा