नगर हादरले..’ सासऱ्याने पाय धरले तर सासूने हात ‘, पिडीतेचे पतीवर धक्कादायक आरोप

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर शहर येथे उघडकीस आली आहे. सातत्याने पैसे मागून देखील पैसे न देणाऱ्या पत्नीला चक्क फिनाईल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिलेचा पती सासरा आणि सासूच्या विरोधात 29 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना ही रेल्वेस्टेशन नजीक असलेल्या जय भिम हौसिंग सोसायटी येथे घडलेली असून पीडित पत्नी स्नेहा यांनी ( वय 25 ) यांनी याबद्दल तक्रार दिलेली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे ‘ शुक्रवारी 28 तारखेला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्याच्या कारणावरून पती दिनेश याने आपल्याला मारहाण केली आणि सासूने माझे दोन्ही हात पकडले तर सासर्‍याने दोन्ही पाय पकडले आणि पती दिनेश याने आपल्या तोंडात जबरदस्तीने फिनाईल ओतून आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले ‘ असे म्हटले आहे.

शनिवारी त्यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला असून पीडित महिलेला आता दवाखान्यातून घरी सोडण्यात आलेले आहे. लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांवरून आपल्याला पैसे आणि वस्तू यांची मागणी करत आपला छळ केला जात आहे, असे महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करत आहेत .


शेअर करा