नाशिकच्या महिला डॉक्टरच्या हाडांचा ‘डीएनए ’ अखेर जुळला : काय आहे पूर्ण प्रकरण ?

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना नाशिक इथे उघडकीस आली होती. नाशिक महापालिकेत कार्यरत असलेल्या महिला अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे या २५ तारखेपासून बेपत्ता झाल्या होत्या आणि रायगडनगरजवळ त्यांची गाडी ही पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. गाडीमध्ये एक जळालेला मृतदेह देखील आढळून आला आणि तो मृतदेह एका महिलेचा असल्यावर शिक्कामोर्तब झाले मात्र तो नक्की डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का ? यासाठी हाडांची डीएनए तपासणी करण्यात आली असताना तो जुळला असल्याने डॉ. सुवर्णा वाजे यांचा घातपात झाल्याची शक्यता बळावली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, डॉ. सुवर्णा वाजे यांच्या जळालेल्या मोटारीत सापडलेल्या हाडांचा डीएनए चाचणी अहवाल अखेर ग्रामीण पोलिसांना बुधवारी दोन तारखेला प्राप्त झाला असून यात सुवर्णा वाजे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा डीएनए आणि जळालेल्या हाडांचा डीएनए एकसमान असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ.वाजे यांना त्यांच्या कारमधून शहराबाहेर नेऊन त्यांच्यासोबत घातपात घडवून आणल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या माेरवाडी सिडको येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८, रा. कर्मयोगीनगर) या २५ जानेवारी रात्रीपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या पतीने अंबड पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यानंतर रायगडनगरजवळ त्याच रात्री वाजे यांची मोटार पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आली. गाडीच्या चेसिज क्रमांकावरून मोटार वाजे यांच्या मालकीची असल्याची खात्री पटली खरी मात्र मोटारीत मिळालेली जळालेली हाडे कोणाची? यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली होती.

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या वडिलांचा डीएनए नमुना संकलित करुन पोलिसांनी हाडे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठविले होते आणि बुधवारी रात्री उशिरा तो अहवाल प्रयोगशाळेकडून पोलिसांना देण्यात आल्याची माहिती आहे त्यानुसार ही हाडे सुवर्णा यांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या पतीची बुधवारी पुन्हा दोन ते अडीच तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून तपास सर्व बाजुंनी सुरु असल्याचे समजते.


शेअर करा