पुण्यात ‘ पुन्हा ‘ घडली कोरोनाबाधित महिलेच्या विनयभंगाची घटना , कुठे घडला प्रकार ?

  • by

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्ग झालेल्या रुग्णांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत असता आरोग्य क्षेत्रातील काही विकृती देखील समोर येत आहेत . गुप्तांगातून स्वब घेण्याच्या महाराष्ट्रातील धक्कादायक घटनेनंतर हडपसरमधील खासगी रुग्णालयात एका महिलेच्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . सदर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील वॉर्डबॉयने विनयभंग केला, त्यानंतर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

हडपसरमधील एका खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे . याआधी देखील पुण्यात अशीच एक घटना घडली होती. आजच्या प्रकरणात एका 35 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर हडपसर पोलिसांनी या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तसेच विनयभंगप्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला अटक केली. आरोपीचं नाव अशोक नामदेव गवळी (वय 40, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी ) असं आहे.

पुणे महापालिकेच्या तब्बल 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यामध्ये 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . यामध्ये 298 जण कायमस्वरुपी तर 76 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी विमा कंपन्यांकडून चालढकल होत असल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि पालिकेत नोकरीचं आश्वासन पाळलं जाईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंनी शनिवारी 2 हजारांचा आकडा ओलांडला. शनिवारी (1 ऑगस्ट) दिवसभरात 5 मृत्यू झाले. जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या 2 हजार 35 वर पोहचली आहे. काल दिवसभरात 2 हजार 709 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली