संतापजनक..सारसबागेतील भीक मागणाऱ्या महिलेने सांगितले ‘ असे की ‘ ?

शेअर करा

महाराष्ट्रात पुणे शहरात एक वेगळीच घटना समोर आलेली असून बेकायदा सावकारी हा काही राज्यात नवीन विषय राहिलेला नाही असाच एक प्रकार उघडकीस आला असून 70 वर्षीय वृद्ध महिलेने तिच्या नातीवर उपचारासाठी दहा टक्के व्याज दराने घेतलेल्या 40 हजार रुपयांच्या बदल्यात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यांनी तब्बल साडेनऊ लाख रुपये उकळले असल्याचा प्रकार समोर आला आहे. खडक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून प्रकरणाचा तपास सुरु आहे. दिलीप विजय वाघमारे ( वय 52 राहणार गंजपेठ ) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून दिलीप वाघमारे हा पुणे महापालिकेत कार्यरत आहे. ज्येष्ठ महिलेला मिळणाऱ्या निवृत्तीवेतन यामधून आरोपीने तिच्याकडून हे पैसे घेतलेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे वय 70 वर्ष असून तिच्या नातीच्या उपचारासाठी तिने वाघमारे याच्याकडून दहा टक्के व्याज दराने 40 हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात महिलेने कर्ज काढून आरोपीला त्याची मुद्दल 40000 आणि त्यावर नऊ लाख रुपये व्याजापोटी दिले होते मात्र तरीदेखील वाघमारे यांची हाव वाढतच होती. वृद्ध महिला ही अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन आरोपी तिला अधिक व्याज आहे असे ठासून सांगत तिच्याकडून पैसे उकळण्यासाठी वेगवेगळे प्रकार करत होता. व्याज वसूल करण्यासाठी त्याने या महिलेची दोन एटीएम कार्ड आणि पासबुक देखील या नराधमाने काढून घेतले तसेच एटीएमवर जमा होणारे दरमहा 16 हजार रुपये त्याने काढून घेतले आणि महिला केवळ खर्चासाठी एक ते दोन हजार रुपये देत होता ही देखील माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्याचा हा प्रकार सुरू होता आणि अशाच पद्धतीने त्याने वसुली केल्याचे समोर आले आहे.

पाच वर्षे लुबाडणूक करून देखील त्याचे समाधान होत नव्हते आणि ‘ अजून तुझ्या कडून घेणे आहे ‘ असे सांगत सातत्याने तिची लूट करत होता आणि एटीएम कार्ड आणि पासबुक देण्यास देखील नकार देत होता. वाघमारेकडून अशी फसवणूक झाल्यानंतर महिला ही अशिक्षित असल्याने तिच्याकडे जगण्यासाठी कुठलेही आधार राहिला नाही आणि चक्क उपासमारीची वेळ आली. सारसबाग गणपती समोर फूटपाथवर ही महिला भीक मागून जगत होती त्यावेळी एका भाविकाने तिच्याकडे विचारपूस केली असता तिने आपल्या सोबत घडलेला हा हा धक्कादायक प्रकार या भाविकांना सांगितला .

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी या महीलेला भेटून तिची व्यथा ऐकून घेतली आणि त्यानंतर वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल केला. वाघमारे यांच्या घराची झडती घेतली असताना त्याच्याकडे पेन्शन धारक असलेल्या आठ व्यक्तींचे एटीएम कार्ड आणि पासबुक देखील आढळून आली . अशाच पद्धतीने वाघमारे याने आणखी किती जणांना त्रास देऊन बेकायदेशीरपणे सावकारी करत लुबाडणूक केली आहे याचा तपास सुरू असून वाघमारे याने आणखी कोणाला त्रास दिला असेल तर नागरिकांनी पीडित नागरिकांनी खडक पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


शेअर करा