‘ काँग्रेसमुळे कोरोना ?’ मोदींची सोशल मीडियावर फिरकी तर बाळासाहेब थोरात म्हणाले ?

शेअर करा

महाराष्ट्र कॉंग्रेसने देशभर कोरोना पसरवला नाही तर केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे जे लोक महाराष्ट्रात अडकून पडले होते त्यांना त्यांच्या राहत्या घरी सुखरूप पोचवण्यासाठी गाड्या सोडल्या. महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्याची सोय करून दिली. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशच जनता भाजपला जाब विचारत आहे त्यामुळे महाराष्ट्रावर आरोप करण्यासारखा बेजबाबदारपणा दुसरा नाही, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी मोदी यांना चांगलेच फटकारले आहे

राज्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटले यांनी म्हटले आहे की, ‘ लोक स्वतःहून स्टेशन वर गर्दी करत होते. रेल्वे बंद असल्याने रस्त्याने पायी जात होते त्यावेळी पंतप्रधान लोकांना टाळ्या वाजवणे आणि दिवे लावण्याचे काम सांगत होते. कोरोना महाराष्ट्रातून देशात पसरला नाही तर केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करता आली नाही कारण त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांची सभा घ्यायची होती’ .

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी यांनी म्हटले की, ‘ कोरोना काळात उत्तर भारतीय मजूर बांधवांना महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसने केलेल्या मदतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. केंद्र सरकारने आपले अपयश लपवण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये ‘.

बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी, ‘ काँग्रेसमुळे कोरोना पसरला असा आरोप केंद्र सरकार करत असेल तर जागतिक महामारी भारतात आलीच कशी त्यासाठी जबाबदार कोण ? कोरोनाचे अपयश लपवण्यासाठी मोदी असे आरोप करत आहेत असे म्हटले आहे. दुसरीकडे मोदी यांच्या काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला या विधानाची सोशल मिडीयावर देखील खिल्ली उडवली जात असून अजून किती दिवस काँग्रेसच्या नावाने मोदी गळे काढणार ? स्वतः काय केले ते का सांगत नाहीत अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.


शेअर करा