‘ इलेक्ट्रिक बाईक शोरूम सुरु करा ‘ , बेरोजगार तरुणाला जाळ्यात ओढले अन ..

शेअर करा

देशात फसवणूक करण्यासाठी कोण कोणती पद्धत वापरता येईल याचा काही नेम राहिलेला नाही. अशीच एक घटना नवी मुंबई येथे उघडकीस आलेली असून इलेक्ट्रिक बाइकचे शोरूम सुरू करून देण्याच्या बहाण्याने उलवे येथील एका व्यक्तीला तब्बल 27 लाख 35 हजार रुपयांना फसवण्यात आलेले आहे. शोरूमची शाखा सुरू करून देण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडून ही रक्कम घेण्यात आली होती.न्हावाशेवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अजित नलावडे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून दोन वर्षांपूर्वी त्यांची नोकरी गेली असताना त्यांनी दुसरा काहीतरी उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले होते याच दरम्यान इंटरनेटवर त्यांना इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमची एक जाहिरात दिसली त्यानंतर त्यांनी सदर दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता पुढील व्यक्तीने त्यांना सिम्पल एनर्जी नावाच्या कंपनीची ही जाहिरात आहे असे सांगत ई-मेलद्वारे संपर्क साधला होता.

इमेलवर संपर्क झाल्यानंतर कंपनीच्या नावाने दोन व्यक्तींनी प्रतिसाद देत त्यांच्याकडून काही फॉर्म भरून घेतले होते त्यानंतर त्यांनी शाखा सुरू करण्यासाठी आगाऊ रक्कम भरावी लागणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून 27 लाख 35 हजार रुपये घेतले मात्र त्यानंतर कोरोनाच्या नावाखाली सातत्याने त्यांना प्रतिसाद देणे टाळत होते. पुढे जाऊन संबंधित त्याचे फोन नंबर देखील बंद झाले आणि नलावडे यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.


शेअर करा