महाराष्ट्र हादरला..दीर-भावजयीने भर रस्त्यात एकमेकांना मिठी मारली आणि…

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली असून औरंगाबाद जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील करमाड इथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर चक्कर येऊन कोसळलेल्या प्रेमी युगुलाने एकमेकांना मिठीत घेत जीव सोडला आहे . परिसरात या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. मोबाईलवरून त्यांची ओळख पटली असून दोघेही नात्याने दीर भावजय असल्याचे समोर आलेले आहे .

उपलब्ध माहितीनुसार , बदनापूर तालुक्यातील दोघेही रहिवासी असून काकासाहेब बबन कदम (वय ३२) व सत्यभामा अशोक कदम (२७) अशी दोघांची नावे आहेत. अत्यंत वर्दळीच्या जालना रोडवर ही घटना घडली असून शुक्रवारी संध्याकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झोकांड्या खात एक पुरुष व महिला येताना दिसले आणि ते अचानक खाली रस्त्यावर पडले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि उलट्या देखील होत होत्या. नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली. पोलीस येईपर्यंत दोघेही रस्त्यावर हातपाय खोडत तडफडत होते मात्र याचदरम्यान त्यांचा मोबाईल बाजूला पडला आणि पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना या मोबाईलच्या आधारे माहिती घेत कळवले आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झालेला होता .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील सत्यभामा आणि तिची बहीण दोघेही गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आल्या होत्या. आणि त्यानंतर दोघी बहिणी बेपत्या झाल्या होत्या. बहिणीचा शोध लावण्यात आला मात्र सत्यभामा या आढळून आल्या नव्हत्या. तपासात सत्यभामा यांचे चुलत दीर काकासाहेब याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती आणि पोलीस दोघांचाही शोध घेत होते मात्र याचदरम्यान ही दुर्घटना घडली. दीर काकासाहेब हे देखील विवाहित असून त्यांना दोन अपत्ये आहेत तर सत्यभामा यांना देखील दोन अपत्ये आहेत.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही विष प्रश्न केले आणि त्यानंतर झोकांड्या खाऊ लागल्यावर ते रस्त्यावर कोसळले. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजयसिंग जारवाल यांनी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. दोघांना चिकलठाणा इथे उपचारांसाठी दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. मोबाईलवरून त्यांची ओळख पटली असून मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असल्याने मोबाईलमधील माहिती अद्याप देण्यात आलेली नाही . मोबाईलमधून आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .


शेअर करा