अबब ..बायकोचे आधी आठ पती असल्याची त्यालाच नव्हती कल्पना, त्याने हौसेने थाटला संसार मात्र ?

  • by

 39 total views

संसार म्हटले की थोडीफार तडजोड आलीच मात्र ह्या महिलेला ते मान्यच नव्हते . लग्नानंतर भांडण झाले की काही दिवसातच ती त्या पतीला सोडून द्यायची आणि नवीन पती शोधून काही कालावधीतच त्याच्यासोबत दुसरा संसार थाटायची . एक दोन तीन असे करत तिने तब्बल ९ जणांशी लग्ने केली मात्र नवव्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून तिची गळा चिरून हत्या केली .घटना हैद्राबादमधील पहाडी शरीफ भागातली असून मृत्यूसमयी पत्नीचे वय हे फक्त ३० वर्षे होते .

उपलब्ध माहितीनुसार, मयत महिलेचे नाव वरालक्ष्मी असून तिच्या नवव्या पतीचे नाव नागार्जुन असे होते. पती नागार्जुन हा कुरनूर जिल्हयातील श्रीराम कॉलनीत रहायला होता आणि व्यवसायाने तो टॅक्सी ड्रायव्हर होता . वरालक्ष्मी काटेदार इंडस्ट्रीयल भागात काम करत होती त्याचदरम्यान वरालक्ष्मी हिच्यासोबत नागार्जुनचे संबंध वाढले होते. कालांतराने त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी वरालक्ष्मीने आपला पती व मुलाला सोडून दिले आणि नागार्जुनशी लग्न देखील केलं.

लग्न झाल्यानंतरही वरालक्ष्मी परपुरुषाकडे झटपट आकर्षित होत असे .त्यावरून लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्या दोघांमध्ये खटके उडू लागले. आपल्या पत्नीची दुसऱ्या पुरुषांसोबत होत असलेली जवळीक नागार्जुनला आवडत नव्हती. आपल्या पत्नीचे बाहेर देखील अनैतिक संबध असावेत असा संशय नागार्जुनला येऊ लागला.

आपल्या संसारात अडचणी येऊ नयेत म्हणून नागार्जुनने तिला वेळोवेळी समजावून पाहिले मात्र तिच्या वागण्यात काही बदल होत नव्हता. मंगळवारी पुन्हा याच गोष्टीवरुन दोघांमध्ये वादंग निर्माण झाला आणि अखेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन नागार्जुनने रागाच्या भरात तिच्या गळ्यावरुन सुरा फिरवला आणि तिची हत्या केली. वरालक्ष्मीचे नववे लग्न होते तर मृत्यूसमयी तिचे वय फक्त ३० वर्षे होते.

हैद्राबादमधील पहाडी शरीफ या भागात धक्कादायक घटना घडल्याने परिसरात ह्या घटनेची जोरदार चर्चा आहे .आपल्या हातून रागाच्या भरात खून झाल्याचे लक्षात येताच नागार्जुनने स्वत:च पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये नागार्जुन हा महिलेचा नववा पती असल्याचे उघडकीस आले, नागार्जुनला देखील आपल्या पत्नीच्या याआधीच्या सर्व लग्नांबद्दल माहिती नव्हती . मृत महिला पुरुषांशी जवळीक साधायची आणि काही काळातच त्यांच्याशी लग्न करायची मात्र तिचा खून झाल्याने ह्या प्रकारचा शेवट झाला.