औरंगाबाद हादरले..कारमध्ये ‘ नको ते ‘ प्रकरणात वेगळीच माहिती आली समोर

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून औरंगाबाद शहरानजीक असलेल्या गांधेली शिवारातील आडरानात उभ्या केलेल्या कारमध्ये भीषण स्फोट झाल्यावर एक जोडपे अर्धनग्न अवस्थेत कारमध्ये आढळून आल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा होती. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले असताना दोघांचा स्फोटाच्या धक्क्याने गुदमरून मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , रोहिदास गंगाधर आहेर (वय 48, रा. जवाहर कॉलनी) आणि शालिनी सुखदेव बनसोडे (वय 35,रा. उल्कानगरी) अशी दोघांची नावे आहेत. पोलिस तपासात कारमध्ये लायटर व सिगारेटची थोटकेही आढळून आली तर भाजीपाला, किराणा साहित्य आढळून आले. सदर गाडी ही एका नामांकित बिल्डरची असल्याने परिसरात वेगळीच चर्चा रंगली होती मात्र आता या शंकांना पूर्णविराम मिळालेला आहे .

रोहिदास आहेर हे मूळचे वैजापूर तालुक्यातील रहिवासी असून ते कुटुंबीयांसह 2004 पासून कामानिमित्त औरंगाबाद इथे राहत होते आणि अथर्व बिल्डर्सचे मालक रवींद्र जैन यांच्याकडे चालक म्हणून काम करीत होते. दुपारी भाजीपाला आणण्यासाठी म्हणून ते कार घेऊन बाहेर पडले त्यानंतर ते घरी परतले नाहीत आणि शालिनीसोबत नग्न अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत कारमध्ये आढळून आले. विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे.

शालिनी धुणी-भांडी काम करत असल्याची माहिती समोर आली असून बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कामाचा खाडा नको म्हणून घराबाहेर पडल्या होत्या. सदर कार ही परिसरात एका आडरानात उभी केली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कारमधून मोठ्या स्फोटाचा आवाज आला. एका शेतकर्‍याने ही चिकलठाणा पोलिसांना हा प्रकार सांगितल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. रोडगे घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी रोहिदास आणि शालिनी हे मागील सीटवर बेशुद्धावस्थेत होते त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला. गाडीच्या नम्बरवरून प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यास पोलिसांना यश आले.


शेअर करा