प्रियकरासोबत ‘ नको त्या ‘ अवस्थेत आईला पाहिले , आईने घेतला असा निर्णय की ..

शेअर करा

आपल्या मुलाला थोडा साजरे खरचटलं तरीदेखील आईला असह्य वेदना होतात मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात अशा काही घटना घडल्या आहेत की महिलेला आई कसे म्हणावे असा आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही, अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात समोर आलेली आहे त्यामध्ये आईने आपल्या मुलाची अमानुषपणे हत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात ही घटना घडलेली असून संगीता रमेश बागुल ( वय 35 ) असे या पाषाणहृदयी आईचे नाव आहे तर सार्थक रमेश बागुल ( वय 9 ) असे मयत मुलाचे नाव आहे. आईचे बाहेर विवाहबाह्य संबंध होते त्यातून तिने तिचा प्रियकर असलेला साहेबराव माणिकराव पवार ( वय 52 ) याला हाताशी घेत मुलाचा खून केला आहे.

वैजापूर तालुक्यातील एका जंगलामध्ये 17 तारखेला पोलिसांना एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला होता. अत्यंत कुजलेल्या परिस्थितीत हा मृतदेह आढळून आल्याने त्याची ओळख पटवणे हे देखील पोलिसांपुढे मोठे आव्हान होते मात्र पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवताच त्याच्या आईला बोलवले असता मुलाचा मृतदेह पाहून देखील तिला रडू आले नाही ही बाब पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला.

सदर मयत मुलगा हा आपलाच आपलाच असल्याची कबुली तिने दिली मात्र तिला रडू आले नाही म्हणून पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला आणि त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असताना तिचे साहेबराव याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. तपासणीसाठी म्हणून तिला ताब्यात घेतले असता पोलीसी खाक्या दाखवतात तिने खुनाची कबुली दिली आहे आणि प्रियकरासोबत आपल्याला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले मुलाने पाहिले म्हणून आपण त्याचा खून केला अशी कबुली या आईने दिली आहे.


शेअर करा