वर्चस्व कुणाचे यातून नांदेडमध्ये गॅंगवॉर..सराईत गुन्हेगार विक्की चव्हाण ठार

शेअर करा

लॉकडाउनच्या काळात शांत असलेल्या नांदेडमध्ये पुन्हा गुन्हेगारी वाढू लागली आहे . वर्चस्व कुणाचे यावरून नांदेडमध्ये रविवारी गॅंगवॉरचा भडका उडाला आणि त्यात एका सराईत गुंडाचा खून करण्यात आला. शंकरराव चव्हाण चौक गाडेगाव रस्त्यावर रेल्वे फाटकाजवळ रविवारी रात्री गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात सराईत गुन्हेगार विक्की चव्हाणचा मृत्यू झाला.शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव रोडवर ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की चव्हाण आणि त्याचा मित्र अभिषेक मुन्नाजी मेहरे (19) रविवारी रात्री दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी आरोपी अर्पित नरेंद्र निंबोरकर आणि त्याचा मित्र अभिषेक उर्फ सनी राजेश वराडपांडे यांनी दोघांचा रस्ता अडवला. अर्पितने रस्ता अडवल्यामुळे विक्की संतापला आणि दोघांमध्ये शिवीगाळ झाली आणि गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर अर्पित आणि त्याच्या मित्राने विक्कीवर चाकूने हल्ला केला आणि यात विक्कीचा मृत्यू झाला.

विक्कीचा मृत्यू झाल्याचे कळताच त्या दोघांनी विक्कीला गाडीत टाकून फरार झाले मात्र वाटेतच विक्कीचा मृत्यू झाल्याचे पाहून त्यांनी विक्कीचा मृतदेह हा हसापूर भागात नदीवरील पुलाखाली फेकून दिला .गोळीबाराची घटना घडलेल्या घटनास्थळी पादत्राणे व रक्त सांडल्याचे आढळले असून मात्र गोळीबार कुणी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

विक्की हा काही महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटला होता. जेलमधून सुटल्यानंतर विक्की पुन्हा गुन्हेगारीकडे वळला. विक्की हा तडीपार गुंड होता. या भागात वर्चस्व सिद्ध करण्याच्या वादातून विक्की चव्हाण आणि आरोपी अर्पितमध्ये वाद झाला होता. त्यातूनच त्याचा खून झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी अर्पित नरेंद्र निंबोरकर आणि अभिषेक वराडपांडेला अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


शेअर करा